फळांचा रस आरोग्यासाठी चांगला असतो. अनेकांच्या रोजच्या आहारात विविध फळांचे रस असतात. फळांचा रस तयार करण्यासाठी आपण मुळात ब्लेंडर मशीन वापरतो. पण, एका फळांच्या रसाच्या दुकानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात एक माणूस सायकलवरून बसून फळांचा रस बनवताना दिसत आहे. फळांच्या रसाच्या दुकानात ग्राहकांना स्वतःला सायकलवर बसून हवा तो ज्यूस तयार करून घ्यावा लागतो. हे एकून तुम्हाला अजब वाटेल. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक माणूस सायकलवर बसलेला दिसत आहे. सायकलच्या समोर एक ब्लेंडर मशीन लावण्यात आलीय. सायकलवर बसलेला व्यक्ती जसजसं पॅंडल मारतोय, तस तसं सायकलवर बसवण्यात आलेलं हे ब्लेंडर मशीन गरगर फिरू लागतं. सायकलचे पॅंडल फिरवरून ग्राहकांना आपल्या हवा तो ज्यूस बनवून येत आहे. या व्हायरल व्हिडीओमधल्या ग्राहकाचं नाव मोहित केसवानी असं असून तो स्वतःसाठी कलिंगडचा ज्यूस बनवताना दिसत आहे. हा अजब गजब देसी जुगाड वापरून ज्यूस तयार करताना व्हिडीओ त्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केलाय.

आणखी वाचा : नवरदेवाच्या जबरदस्त डान्सपुढे नवरी सुद्धा फिकी पडली; वऱ्हाडी सुद्धा झाले अवाक, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ thegreenobar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमधला देसी जुगाड पाहून लोक आश्चर्य होऊ लागले आहेत. हा व्हिडीओ अहमदाबादमधल्या एका ज्यूसच्या शॉपचा असून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे शॉप सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवसाय करणं आणि शक्य तितक्या कमी कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे दुकानाचे मुख्य ध्येय आहे. फळांचा रस बनवण्याच्या या पर्यावरणपूरक पद्धतीनं इन्स्टाग्राम युजर्सना भुरळ पडली आहे. आतापर्यंत सुमारे एक कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर सुमारे चार लाख लोकांनी या व्हिडिओला प्रतिसाद दिला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : प्रेमासाठी हे पण! बॉयफ्रेंडला जळवण्यासाठी मुलीने काय केलं पाहा, दुसऱ्यासोबत करावं लागलं लग्न आणि…

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पतंग उडवता उडवता थेट आकाशातच पोहोचला, मांजाला पकडत हवेतच लटकत राहिला, पाहून हैराण व्हाल!

सायकलवरून पॅंडल मारत ज्यूस तयार करण्याचा हा देसी जुगाड लोकांना खूपच आवडला आहे. ही पद्धत पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्यामुळे या प्रक्रियेत कोणताही कचरा निर्माण होत नाही. यावर लोक आपल्या वेगवगेळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.

एका युजरने लिहिलं, “हे डिव्हाईस जिममध्ये असलं पाहिजे, आपल्या फळांचा रस स्वतःच बनवा.” दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, “मेहनतचं ज्यूस कायम गोडचं असतं.”. काही युजर्सनी या देसी जुगाडचं कौतुक केलंय. “व्यायाम पण आणि सोबतच आरोग्यासाठी उपयुक्त ज्यूस पण…” अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर शेअर करण्यात येत आहेत.

Story img Loader