जगात कौशल्याची काही कमतरता नाही. सोशल मीडिया हे आज एक असं माध्यम बनलंय, जिथं असे प्रतिभावान लोक रोज व्हायरल व्हिडीओद्वारे भेटत असतात. यातील काही व्हिडीओ इतके अप्रतिम असतात, की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. सध्या एका काश्मीरी तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या मुलाचं कौशल्य पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडीओमध्ये मुलगा परफेक्ट पद्धतीने वस्तू फेकताना दिसत आहेत. ज्या वस्तू तो फेकतोय त्या कुठेही मागे पुढे न पडता योग्य ठिकाणीच परफेक्ट बसलेल्या दिसून येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रतिभावान लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहतात, परंतु ते सोशल मीडियावर एक ना एक दिवस नक्कीच दिसतात. या एपिसोडमध्ये काश्मीर मधला एक मुलगा आपल्या कौशल्यानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहताच व्हायरल झाला आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, तो इमारतीच्या खाली उभा राहून पाण्याची बॉटल वरच्या मजल्यावर अगदी उभी राहील अशाच पद्धतीने फेकतो आणि ती व्यवस्थित उभी राहते. त्यानंतरच्या क्लिपमध्ये पुढ्यात बसलेल्या एका मुलाच्या दिशेने टोपी फेकतो आणि ती त्या मुलाच्या बरोबर डोक्यावर जाऊन बसते. पुढच्या क्लिपमध्ये हा मुलगा आपल्या पायांनी फुटबॉल अशा पद्धतीने फेकतो तो फुटबॉल रिव्हर्समध्ये येऊन त्याच्या बॅगेतच बसतो. त्याचपद्धतीने हाच फुटबॉल दुसरा एक मुलगा घेऊन जात असलेल्या बादलीत बसेल अशा पद्धतीने फेकतो आणि यातही तो यशस्वी होतो. शेवटच्या क्लिपमध्ये दोन ग्लास आणि त्यावर सेलोटेपमध्ये उभी ठेवलेली दिसत आहे. काही अंतर पुढे हा मुलगा चेंडूसोबत खेळताना दिसून येत आहे. हा चेंडू तो असा फेकतो की तो पुढे दोन ग्लासवर ठेवल्या सेलोटेपच्या मधून पार होतो.

या मुलगा असे अनेक अद्भुत पराक्रम करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही मुलाच्या कौशल्याची खात्री पटली असेल. या मुलाने ज्या पद्धतीनं आपलं कौशल्य दाखवलंय, ते पाहता त्याने यासाठी खूप सराव केला असेल असं वाटतं. कारण ज्या टायमिंगनं आणि परफेक्ट दिशेने आपलं कौशल्य दाखवलंय ते खरोखरच आश्चर्यकारक आहे.

काश्मीरमध्ये राहणाऱ्या या ट्रिक शॉट आर्टिस्टचं नाव शाह हुजैब असं आहे. हा तरुण फुटबॉलपटू आपल्या कारनाम्याने मोठ्या लोकांना आश्चर्यचकित करत आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये तो आपले कौशल्य दाखवत आहे. नेटिझन्ससोबतच बडे दिग्गजही त्याची स्टाईल पाहून हैराण झाले आहेत. त्याच्या टॅलेंटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, त्याला काश्मीर यंग अचिव्हर्स अवॉर्ड 2022 देखील देण्यात आला आहे.

आणखी वाचा : हातावर पोट असलेल्या आजोबांची हातगाडी अधिकाऱ्यांनी उलटवली, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तीन चित्त्यांसोबत झोपलेल्या माणसाच्या त्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर…

शाह हुजैबला त्याच्या प्रतिभेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळू लागली आहे. त्याच्या इशाऱ्यावर तो फुटबॉल आणि चेंडूला कसा फेकतो ते दिसत आहे. त्याचे बॅलन्स स्कील आणि टॅलेंट अप्रतिम आहे. शाह हुजैबच्या प्रतिभेने प्रभावित होऊन भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बाईचुंग भुतियाने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अप्रतिम ट्रिक शॉट्स. शहा चांगले काम करत राहा.” बायचुंग भूटिया हा व्हिडीओ शेअर करताना #keepgoing देखील जोडले आहे.

ट्रिक-शॉट पाहून दिग्गजांनाही आश्चर्य वाटले
शाह हुजैबलाही पूर्वी इतर भारतीय मुलांप्रमाणे क्रिकेटची आवड होती. तो ७ वर्षे क्रिकेट खेळला. पण नंतर त्याचे फुटबॉल ट्रिक शॉटवर प्रेम वाढत गेले. त्याला पाहून त्याने कठोर परिश्रमातून उत्कृष्ट कौशल्ये आत्मसात केली आहेत. शाह हुजैबने ४०० हून अधिक ट्रिक शॉट रेकॉर्ड केले आहेत. भाईचुंग भुतियासोबत बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनेही त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू टोनी क्राऊसनेही त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एकदा पाहून लोकांचं मन भरत नाही तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर तो पुढे सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह देखील लोकांना आवरता येत नाही, त्याचपद्धतीने या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरसः पाऊस पाडत मुलाच्या टॅलेंटचं कौतुक करताना दिसत आहेत.