Viral Video of Landslide: पावसाळा सुरू झाला की अपघात, भूस्खलनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यातली घटना नेमकी कुठे घडली याचा पत्ता लागलेला नसतानादेखील सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जातात. FACT CHECK द्वारे आपण असे व्हिडीओ नेमके कुठले आहेत? या घटना नेमक्या कुठे आणि घडल्या आहेत याची माहिती काढतो.

FACT CHECK

देशाच्या विविध भागांमध्ये भूस्खलन आणि मुसळधार पावसाच्या वृत्तांदरम्यान, लाइटहाऊस जर्नलिझमला रस्ता खचल्याचा दाखवणारा एक व्हिडीओ सापडला, जो भारताचा आहे असे दावे केले जात होते. आमच्या तपासादरम्यान आम्हाला आढळले की, व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत आणि हा व्हिडीओ वास्तविक तुर्कीचा आहे.

Massive tree falls in Ubud Monkey Forest in Bali kills two tourists tragic incident caught on camera
Bali: जंगलात फिरत होते पर्यटक, अचानक कोसळले भले मोठे वृक्ष; दोन पर्यटकांनी गमावला जीव, थरारक Video Viral
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

हेही वाचा… भारत की पाकिस्तान? शिक्षकाचे विद्यार्थ्यावर अत्याचार, छतावर उलट लटकवलं अन्…; VIRAL VIDEO नेमका आहे कुठला? पाहा

काय होत आहे व्हायरल? (VIRAL VIDEO)

X युजर Rajiv Tyagi ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला.

या पोस्टचा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://archive.ph/HhEww

इतर वापरकर्तेदेखील याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास (Investigation)

आम्ही व्हिडीओचे स्क्रीनशॉट मिळवले आणि आमचा तपास सुरू केला. नंतर या स्क्रीनशॉट्सवर रिव्हर्स इमेज सर्च करत हा तपास सुरू केला.

एका कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्चद्वारे, आम्हाला तोच व्हिडीओ १२ ऑक्टोबर २०२३ रोजी TV Teuta च्या Facebook पेजवर अपलोड केलेला आढळला.

https://www.facebook.com/watch/?v=781570620439704

कॅप्शनमध्ये नमूद केले होते : Deti i Zi (Karadeniz) Turqi

या कॅप्शनमुळे असे कळले की, हा व्हिडीओ भारताचा नसून तुर्कीचा आहे.

हेही वाचा… डान्स VIDEO शूट करताना मागून हवेच्या वेगाने आली बाईक अन्…, पुढे तरुणीबरोबर ‘जे’ काही घडलं ‘ते’ पाहून व्हाल थक्क

आम्हाला हा व्हिडीओ redd.tube वरदेखील आढळला.

https://www.redd.tube/video/bec6c558a7b4ea03430c76c250067f297c6ddb69

या व्हिडीओचे शीर्षक होते: Landslide right at the end of a tunnel at Ordu in Turkey | 10 July 2023

याचा स्रोत reddit.com वर होता.

वर्षभरापूर्वी अपलोड केलेल्या वर्ल्ड इव्हेंट्स न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर आम्हाला या घटनेचा व्हिडीओदेखील सापडला.

रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान आम्हाला एक बातमीदेखील आढळली, ज्याने व्हिडीओ तुर्कीचा असल्याची पुष्टी केली.

https://www.yenicaggazetesi.com.tr/olum-garantili-yol-yandas-muteahhidin-yaptigi-yol-coktu-685287h.htm

हेही वाचा… हीच खरी माणुसकी! पावसाच्या पाण्यात बुडणाऱ्या श्वानाची मृत्यूच्या दारातून सुटका; VIRAL VIDEO पाहून कराल कौतुक

निष्कर्ष (Conclusion)

रस्ता कोसळल्याचा हा व्हायरल व्हिडीओ भारतातील नसून तुर्कस्तानमधील आहे. ही तुर्कस्तानमधील एक जुनी घटना आहे जी गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतेय. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

Story img Loader