जंगलाचा राजा सिंह असो किंवा सर्वाधिक शिकार होणारं हरीण असो, जंगलातील आयुष्य कुठल्याच प्राण्यासाठी सोपं नसतं. सिंह, वाघ आणि बिबट्या हे जंगलातील सर्वात घातक प्राणी मानले जातात. हे प्राणी डोळ्याची पाणी मिटण्याच्या आत शिकार करतात. यांच्या तावडीतून सुटणं जवळपास सगळ्याच प्राण्यांसाठी अशक्य असतं. कारण शक्तीसोबतच त्यांच्यात तितकाच चपळपणाही असतो. सध्या एका बिबट्याच्या शिकारीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
आपल्या सर्वांना माहिती आहे की जंगलातील जग अतिशय वेगळं असतं. इथे प्रत्येक प्राण्याला सतत सावध राहावं लागतं. कारण इथे प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की एका बिबट्याने हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला आहे.
आणखी वाचा : दोन ट्रेनमध्ये अडकलेल्या घोड्याचा जीव कसा वाचला? VIRAL VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हरीण जंगलात गवत खाताना दिसत आहे. आपल्याच धुंदीत गवत खात असताना पुढे जाऊन त्याच्यावर मोठं संकट येणार आहे, याची कल्पना देखील त्याला नव्हती. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की, त्याला आपल्या आसपास असलेल्या धोक्याची चाहूल लागलेली आहे. याच कारणामुळे ते एकटक आपल्या आजूबाजूला पाहत आहे. इतक्यात एक बिबट्या झाडीतून बाहेर येतो. हलक्या पावलांनी आड मार्गाने येत येत हा बिबट्या हरणावर दबा धरून बसलेला असतो. हरीण गवत खाण्यात मग्न असताना हा बिबट्या एका झाडामागून येतो. तोपर्यंत या हरणाला त्याच्यावरील हल्ल्याची चाहूल सुद्धा लागलेली नसते.
आणखी वाचा : Panda Video : पांडा पाण्यात खेळतानाचा VIRAL VIDEO पाहून विसराल सर्व दु:ख, आवरणार नाही हसू
हरणाला पाहिल्यामुळे त्याची शिकार करण्यासाठी बिबट्या चांगल्याच तयारी उतरलेला दिसून येतोय. अत्यंत चलाखीने दबक्या पावलाने तो हरणाकडे हळुहळु जातो आणि योग्य वेळ मिळताच अगदी वाऱ्याच्या वेगाने हरणारवर हल्ला चढवला. अचानकपणे हल्ला झाल्यामुळे हरिण पुरता गोंधळून जातो. आफल्यासोबत काय घडतंय हे समजण्याच्या आताच बिबट्याने हरणाचा फडशा पाडला.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : जनतेचं मत समजून घेण्यासाठी पत्रकाराने गाव गाठलं, पण आजोबांचं उत्तर ऐकून चक्रावून गेला
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : नवरीने नातेवाईकांसोबत केला जबरदस्त भांगडा डान्स, लग्नाचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
हा व्हिडीओ पाहून तुमचं मन हेलावून जाईल. biltekpluss नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. बिबट्याच्या अशा शिकारीचा व्हिडीओ तुम्ही यापूर्वी कधी पाहिलाच नसेल. या शिकारीचा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. केवळ दोन दिवसांत या व्हिडीओला ६२ लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडीओवर लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुरेंदर मेहरा यांनी ट्विटरवर शेअर केलाय. ‘धोका कधीही आणि कुठेही असू शकतो. त्यामुळे नेहमी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.