सोशल मीडियावर दररोज नवीन आणि कधीकधी अत्यंत विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. अशा गोष्टी ज्याबाबत आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इंटरनेटवर मजेशीर व्हिडीओ आढळतात, जे लोकांना पुन्हा पुन्हा पहायला आवडतात. साप हा असा प्राणी आहे ज्याला पाहिल्यावर भले भले घाबरतात. पण, सध्या सापाचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जे पाहून तुम्हाला अश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ पाहताना सुरूवातीला गवत असल्याचा भास होऊ लागतो. पण ज्यावेळी हालचाल झालेली दिसून येते त्यानंतर आणखी निरखून पाहिलं की ते गवत नसून एक साप असल्याचं दिसून येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समोर साप येताच कुणीही घाबरणे साहाजिकच आहे. कारण, तो ज्याप्रकारे टक लावून पाहतो ते पाहून कोणालाही भीती वाटेल. मात्र, या व्हिडीओमध्ये तुम्हाला सापाचे वेगळेच रुप पाहायला मिळणार आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला सापांची एक अशी प्रजाती दाखवणार आहोत, जो तुम्‍ही तुमच्‍या आयुष्यात क्वचितच पाहिला असेल. हा गूढ साप दिसायला खूप गोंडस दिसतो, सुरूवातीला ते गवत असल्यासारखं वाटू लागतं. मात्र साप रेंगाळू लागताच तो साप असल्याची माहिती मिळते. गवतासारख्या दिसणार्‍या अनोख्या सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गवत सदृश सापाचा हा व्हिडीओ थायलंडमधील असल्याचं सांगितले जात आहे, जो स्यू नावाच्या ४९ वर्षीय रहिवाशाने या सापाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. मात्र, हा व्हिडीओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला आहे, याची अद्याप खात्री झालेली नाही. रिपोर्ट्सनुसार, स्यू यांनी घराच्या मागे असलेल्या दलदलीत हा साप पाहिला. साप एका जागी थांबला की तो गवतासारखा दिसतो. पण साप थोडासा सरकला आणि रांगायला लागला की तो साप असल्याचे कळतं.

आणखी वाचा : माणसांप्रमाणे दोन पायांवर चालतो हा कुत्रा, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शहरातल्या लग्नासाठी गावाकडची माणसं आली, कारंजे पाहून त्यांनी काय केलं पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, द सायन्स टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये या सापाचे नाव ‘फ्युरी स्नेक’ असल्याचे सांगण्यात आलं. या सापाची कातडी गवतासारखी असते. त्याचवेळी या सापाचा व्हिडीओ शूट करणाऱ्या स्यूने सांगितले की, हा साप पाहिल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मनात या सापाचा व्हिडीओ लोकांना दाखवावा, जेणेकरून हा संशोधनाचा विषय होईल. गवतासारखा दिसणारा सापही तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल. सापाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.