सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी जंगलामधील प्राण्यांचे तर कधी सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतं. अनेकदा एकाच वेळी वेगवेगळ्या अकाऊंटवरुन एखादा व्हिडीओ शेअर केला जातो आणि तो चर्चेचा विषय ठरतो. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला असून या व्हिडीओच्या माध्यमातून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल आपण नम्रपणे राहण्याची आणि त्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचं संदेश दिला जातोय.

नक्की पाहा >> Video: …अन् काही क्षणांमध्ये गाडी पूराच्या पाण्यात वाहून गेली; असा मूर्खपणा कृपया करू नका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाचे नेते पीसी मोहन यांनीही हा व्हायरल व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली मुलगी सैनिकाच्या पाया पडताना दिसत आहे. २५ सेकंदांचा हा व्हिडीओ एका मेट्रो स्थानकावर चित्रित करण्यात आलाय. मेट्रो स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या काही लष्करी गणवेशातील सैनिकांजवळ एक चिमुकली चालत जाताना या व्हिडीओत दिसते. या सैनिकांच्या जवळ गेल्यानंतर तेथील सैनिकांपैकी एकजण तिच्या गालाला हात लावून तिचं कौतुक करतो. त्यानंतर ही चिमुकली थेट या सैनिकाच्या पाया पडते. या चिमुकलीची ही कृती पाहून ज्या सैनिकाच्या ती पाया पडली तो आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये या चिमुकलीचा चेहरा पकडतो आणि तिचं कौतुक करतो. यावेळी या सैनिकाचे सहकाऱ्यांनाही या मुलीने पाया पडून व्यक्त केलेलं प्रेम पाहून हसू येतं.

नक्की वाचा >> …अन् फडणवीस हसून म्हणाले, “…म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही”; सभागृहात पिकला एकच हशा

“देशभक्तीचा मान राखत मुलांना मोठं करणं हे या देशाप्रती प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे,” अशा कॅप्शनसहीत मोहन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जय हिंद आणि भारतीय झेंड्याचा इमोजीसुद्धा त्यांनी या ट्वीटमध्ये वापरला आहे.

नक्की पाहा >> “माझ्याकडे पाहून लोकांना आम्ही माणसं खातो की काय असा संशय आला”; भाजपा आमदाराच्या भाषणाचा Video Viral

नक्की पाहा >> Video: महिला अधिकाऱ्याने BJP च्या माजी आमदाराला सुनावलं; म्हणाल्या, “औकात है तो नौकरी से निकालकर दिखा, चल दफा…”

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याचं, डोळे पाणावल्याचं म्हटलं आहे. १२ हजारांहून अधिक वेळा ही पोस्ट रिट्वीट करण्यात आली असून या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.