मैत्री म्हणजे फक्त दोन शब्द नव्हे किंबहुना ते शब्दात मांडण्यासारखं नसतंच. मैत्री ना रंग पाहत, ना रूप, ना जात, ना धर्म. मैत्री हे अत्यंत स्वच्छंद अशी असतते. मैत्रीला कोणतंही बंधन नसतं. ती कधी, कुठे, कुणावर होईल सांगू शकत नाही. फक्त माणसंच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हेच लागू होतं. आतापर्यंत तुम्ही दोन प्राण्यांच्या मैत्रीचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडीओ दाखवतोय तो माणूस आणि प्राण्याच्या मैत्रीचा आहे. या अनोख्या मैत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये घोड्याने महिलेला मिठी मारली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक व्हाल हे मात्र नक्की.
प्राण्यांचे अतिशय गोंडस आणि मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांनाही हे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात. असं म्हणतात की माणूस आणि प्राणी यांचे नातं खूप खास असतं. यामुळे लोक प्राणी पाळतात आणि त्यांना मित्र म्हणून ठेवतात. कधीकधी दोघांमध्ये मजेदार आणि प्रेमळ क्षण असतात, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे ज्यामध्ये एक महिला आणि घोडा यांच्यातील अनोखी मैत्री पाहायला मिळतेय. प्रेमाने भरलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
आणखी वाचा : लग्नातला नागिन डान्स नव्हे तर खऱ्या किंग कोब्राचा रोमँटिक डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. तेवढ्यात एक घोडा येतो आणि त्या महिलेवर आपलं प्रेम दाखवू लागतो. घोडा आपल्या तोंडाने मुलीची व्हीलचेअर ओढू लागतो. महिलाही घोड्याला मिठी मारताना दिसून येते. दोघांमधलं इतकं प्रेम पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. तसंच हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडलेला आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसून येतंय की प्राण्यांमध्येही माणसांबद्दल खूप भावना आणि खरं प्रेम आहे.
आणखी वाचा : ऑटो चालकाला अडवले, त्याने थेट पोलिसाला उडवले, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : या माकडाच्या स्माईलची साऱ्या जगाला भुरळ पडली, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल
घोडा आणि मानव यांच्या प्रेमाने भरलेला हा व्हिडीओ वर्थफीड या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलं आहे. प्राणीप्रेमींना हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि ते त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत जोरदार शेअर करत आहेत.
अनेक दर्शक या व्हिडीओवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. एका युजरने सांगितले की “प्राणी आपल्याला कोणत्याही लोभाशिवाय माया लावतात” तर दुसर्या युजरने म्हटलंय की “घोडे खूप गोंडस तसंच अतिशय बुद्धिमान आहेत”. तुम्हीही हा व्हिडीओ पाहाल तर तुमच्याही चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.