Viral Video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हल्ली लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन षड्यंत्रे आखून चोरी करतात. पण, वाईट कर्माचे फळ कधी ना कधी मिळतेच. खरंतर, भारतीय महिलांसाठी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लाख मोलाचे असते, त्यामुळे जर त्यावर कोणाची वाईट नजर पडली तर अनेक जणी चवताळतात. आजपर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातल्या मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अनेकदा अशा घटनांमध्ये महिलांचा जीव जातो, तर काहींना गंभीर दुखापतही होते. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय,जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
गेल्या काही महिन्यांमध्ये सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद वाढलेला दिसून येत आहे. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजानिक कार्यक्रमात तसेच दिवसाढवळ्या रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या घटना कॅमेरऱ्यात कैद झाल्या आहेत. साखळीचोरांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की, चोरटं महिलेच्या गळ्याशी जवळ जाऊन, चपळाईने आणि सावधपणे गंठण उचलतो आणि नंतर तिथून पळून जातो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण दुचाकीवर बसलेले दिसत असून, सुरुवातीस असे वाटते की, रस्त्याच्या कडेला उभे राहून कोणाची वाट पाहत आहेत. मात्र हाच त्यांचा डाव असून समोरुन येणाऱ्या महिलांवर त्यांनी बराच वेळ लक्ष ठेवलेलं असतं. जशा या महिला त्यांच्या बाजूला येतात तसं बाईकवर बसलेला मागचा तरुण महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचतो आणि सुसाट बाईक चालवत पळून जातो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून आता सर्वांमध्येच भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना आपल्या अमुल्य गोष्टींची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे.