सोशल मीडियाच्या युगात असे अनेक व्हिडीओ वारंवार व्हायरल होत असतात, जे लोकांचे लक्ष वेधून घेतात. काही व्हिडीओ हे लोकांना आश्चर्य करून सोडणारे असतात, काही व्हिडीओंमध्ये तर अनेकांचे टॅलेंटही दिसून येतं, जे पाहून लोक व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करायला विसरत नाहीत. नुकताच असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या नवीन व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने एकाच वेळी ५० ऑम्लेट खाऊन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्या व्यक्तीच्या जेवणाची स्टाइल पाहून लोक मजेशीर कमेंटही करत आहेत.
‘porchezhiyan_sr’ नावाच्या एका इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन-चार नव्हे तर तब्बल ५० ऑम्लेट खाताना दिसत आहे. यामध्ये टेबलावर केळीच्या पानांमध्ये वेगवेगळ्या अंड्यांचे ऑम्लेट ठेवलेले दिसत आहे. हे सर्व ऑम्लेट हा व्यक्ती लागोपाठ खाताना दिसून येतोय. त्याच्या जेवणाची स्टाइल पाहून लोक अनेक प्रकारच्या कमेंट्सही करत आहेत. “मी माझ्या आयुष्यात सर्वात जास्त ऑम्लेट खाल्ल्या आहेत..!!! भारतीय रेकॉर्ड!!! ५० देशी अंड्याचे ऑम्लेट खाण्याचे आव्हान.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘लाइव्ह’ सुरू असताना महिला पत्रकाराला कारने दिली धडक, अपघातानंतरही रिपोर्टींग सुरूच ठेवलं
या व्हायरल व्हिडीओमधल्या ऑम्लेट खाणाऱ्या व्यक्तीचं नाव सापट्टू रामन असं आहे. जगण्यासाठी जेवायला हवं असं अनेक मोठी मंडळी म्हणायचे, पण काही लोकांचा आहार बघून असं वाटतं की ते जगण्यासाठी खात नाहीत तर खाण्यासाठी जगतात. जगात एकापेक्षा एक खाद्यप्रेमी आहेत, ज्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आवडतात, तर काहीजण असे आहेत जे खाण्याचे चॅलेंज स्वीकारतात आणि त्याला आपली कला बनवतात.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : काय सांगता? एकाच वेळी अनेक मुलींना करत होता डेट, एका टिकटॉक युजरच्या VIRAL VIDEO मुळे झाला भांडाफोड
सापट्टू रामन आणखी एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये दोन पातळ भात किंवा अनेक सांबर वडे खाताना दिसत आहे. त्याच्या व्हिडीओवर लोक एकापेक्षा एक कमेंट करतात. त्याचा हा नवा व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६.१ मिलियन लोकांनी पाहिलं असून त्यावर ४९५ कमेंट्स आल्या आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बहिणीच्या लग्नात करवल्यांनी केला सरप्राईज डान्स,पाहून तुम्हीही पाहतच रहाल!
या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “केळीची पाने शिल्लक आहेत सर, तेही खा.” दुसर्या एका यूजरने लिहिले की, “प्रोटीन हे विष बनले असेल.” त्याचबरोबर काही युजर्स त्यांना असं न करण्याचा सल्लाही देत आहेत की, “या देशातील हजारो करोडो लोक उपाशी राहतात, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त अन्न खाऊ नका.”