अनेक वेळा एखादी व्यक्ती स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेते. म्हणजे सगळे चांगले सुरू असते. मात्र स्वतःहून असे काहीतरी करायचे, आणि त्रास ओढवून घ्यायचा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.., असं भावगीत तुम्ही ऐकलं असेलच. या ओळींना प्रत्यक्षात उतरवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, ‘करावे तसे भरावे’
रस्त्यात येता जाता एखादा कुत्रा दिसला की काही व्यक्ती उगाच रस्त्यावरील कुत्र्यांना त्रास द्यायचा म्हणून कधी त्यांना दगड मारताना दिसून येत असतात कधी त्या कुत्र्यांना घाबरवून पळवण्याचं काम करत असतात. अशा एका व्यक्तीने रस्त्यावरच्या कुत्र्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला खरा. पण त्याबदल्यात त्या व्यक्तीच्याबाबतीत जे घडलं हे पाहणं फारच रंजकदार असणार आहे.
आणखी वाचा : OMG! मच्छिमाराला सापडला १०० वर्ष जुना महाकाय मासा, VIRAL VIDEO पाहून सारेच जण थक्क
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा रस्त्याच्या कडेला शांत उभा असल्याचं दिसून येतंय. यादरम्यान एक व्यक्ती हातात सॅंडवीच घेऊन जाताना दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला कुत्रा दिसताच या व्यक्तीला न जाणे कसली दुर्बुद्धी सुचली आणि त्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करू लागला. पण कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात त्या व्यक्तीचा चालता चालता नियंत्रण बिघडतं आणि धाडकन खाली कोसळतो. कारण नसताना कुत्र्याला लाथ मारणे या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. वाटेला जाणाऱ्या माणसाला त्याच्या कर्माने आपल्या ताकदीचा असा नमुना दाखवला, की तो परत कधीही कोणत्या प्राण्याच्या वाटेला जाणार नाही.
आणखी वाचा : स्विमिंग करणारं माकड कधी पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : शाबास! त्या दोन शाळकरी मुलांनी दाखवली माणुसकी, काही सेकंदाच्या Viral Video ने शिकवला धडा
या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही सुद्धा जेव्हा हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हाला सुद्धा हसू आवरता येणार नाही. लोक हा व्हिडीओ पाहताना अक्षरशः पोट धरून हसत आहेत. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आवर्जून तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर कऱण्यास विसरत नाही.
आणखी वाचा : पोपटासोबत व्हिडीओ बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ डॉ. अजयता नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. हा छोटासा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “व्यक्तीला योग्य शिक्षा मिळाली”. तर दुसर्या यूजरने “जैसी करनी, वै भरनी” असं लिहिलं आहे. काही लोक म्हणतात की, त्या व्यक्तीचा हेतू वाईट होता, त्यामुळे त्याचेही वाईट झाले. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.