Viral Video: माणूस आणि प्राण्यामधील मैत्री तुम्ही खूप वेळा बघितली असेल. ही मैत्री दर्शवणारे (Wildlife Viral Video)अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. परंतु काही प्राणी असे असतात की त्यांच्याशी सहजपणे कोणी मैत्री करत नाही. यामधलं एक महत्त्वाच नाव म्हणजे साप. असेच अनेक विषारी साप एकत्र हातात पकडून एक माणूस उभा आहे. या माणसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे.

ज्यांना सापांची भीती वाटते त्यांच्यासाठी हा व्हिडीओ एखाद्या भयानक स्वप्नासारखा आहे, जिथे एक-दोन नाही तर शेकडो साप दिसत नाहीत. परंतु त्या माणसाला त्यांची अजिबात भीती वाटत नाही, ही वेगळी बाब आहे. या व्हिडीओचे ठिकाण माहित नसले तरी व्हिडीओ कोणत्यातरी जंगलातील आहे. येथे काही लोकांनी थर्माकोलच्या बॉक्समध्ये भरून साप आणले आहेत. विषारी सापांचे कळप एखाद्या सामान्य गोष्टीप्रमाणे बाहेर काढून जंगलात सोडतात. ते त्यांना अजिबात घाबरत नाहीत, उलट ते हे काम अत्यंत समाधानाने करताना दिसत आहेत.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोतला बिबट्या तुम्ही शोधू शकता का? बघा प्रयत्न करून)

(हे ही वाचा: Video: मध्य प्रदेशात अस्वलाच्या हल्ल्यात नवरा-बायकोचा मृत्यू; मृतदेहावर बसून तोडले लचके)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर नेचरलाइफ_ओके नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. १६ एप्रिल रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ८.९ दशलक्ष म्हणजेच ८९ लाख लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असून शेकडो लोकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत.

Story img Loader