आजकाल लोक स्वतःवर नवनवीन प्रयोग करत असतात. कधी कपड्यांमध्ये, कधी sलूकमध्ये तर कधी आपल्या हेअर स्टाईलमध्ये नेहमीच काही ना काही बदल होत असतो. कधी कधी हे प्रयोग यशस्वी होतात, पण कधी कधी अशी स्टाइल समोर येते की प्रेक्षकांना हसू आवरणं कठीण होऊन जातं. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने आपल्या केसांवर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हालाही हसू येईल.

आजकाल सोशल मीडियावर काय आणि केव्हा व्हायरल होईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका मुलाने केसांवर विचित्र प्रयोग केला आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की त्या व्यक्तीने त्याच्या डोक्यावरील सर्व केस काढले आहेत आणि वरच्या व खालच्या बाजूला दोन लहान बाजू सोडल्या आहेत. नंतर, सलून मधल्या या व्यक्तीने ही दोन शिखरे एकत्र केली आणि त्यावर लहान चेंडूसारखे काहीतरी टांगले. अचानक एखाद्या व्यक्तीचा असा प्रयोग पाहून तुमचा विश्वास बसणार नाही, तर दुसऱ्याच क्षणी तुमचे हसू आवरणार नाही.

a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Viral shop Board Quotes in marathi
‘जीव लावण्यापेक्षा…” दुकानाबाहेर लावलेली पाटी चर्चेत; Photo होतोय…
indian railways shocking video
रेल्वे रुळांच्या मधोमध झोपला, वरून गेली भरधाव ट्रेन अन् नंतर घडलं असं की…; Video पाहून व्हाल शॉक
Young Man Exposes the Harsh Truth of a begger in Viral Video
“दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” तरुणाने केली भिकाऱ्याची अशी पोलखोल, VIDEO व्हायरल
Young woman fight on road viral video on social media
आता एकमेकींचा जीवच घेतील! कानाखाली मारलं, झिंज्या उपटल्या अन्…, तरुणींचा भररस्त्यात राडा, पाहा VIDEO
Michael Jackson Video
तरुणाने थेट मायकल जॅक्सनला दिली टक्कर; ‘मून वॉक’ नव्हे तर ‘मून रन’ डान्स केला, व्हिडीओ एकदा पाहाच
Moonlit Kedarnath Dham captivates netizens Anand Mahindra
चंद्राच्या प्रकाशात उजळले केदारनाथ धाम मंदिर! आनंद महिंद्रांना आवडला सुंदर फोटो, तोंड भरून केले कौतुक
Pakistani paraglider lands on chief guest during event video
पाकिस्तानी पॅराग्लायडरने तर हद्दच केली राव! लँडिग करताना अंदाज चुकला अन् थेट…. थरारक Viral Video एकदा बघाच

आणखी वाचा : याला म्हणातात Instant Karma ! मंदिराच्या खिडकीतच अडकला चोर, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ही दोस्ती तुटायची नाय…; पाहा माकड आणि पक्ष्यांची अनोखी मैत्री

व्हायरल होत असलेला हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अर्थेल पेजवर पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तसंच हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलं आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडला असून या व्यक्तीची विचित्र हेअरस्टाईल पाहून ते अक्षरशः पोट धरून हसत आहेत.

तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यास हसून हसून पोट दुखेल. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “तुम्हालाही अशी हेअरस्टाईल ट्राय करायला आवडेल का” असं लिहिलं आहे. या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये प्रेक्षक म्हणत आहेत की “अजिबात नाही”. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.