Viral Video: सोशल मीडियावर दररोज लाखोंच्या संख्येने व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडीओ पाहून धक्काच बसतो. काही लोक अनेकदा कसलाही विचार न करता विचित्र प्रकार करतात आणि आपल्या मर्यादा ओलांडतात. अनेकदा हे करू नका असं स्पष्टपणे सांगितलं तरी माणसं स्वत:ला हवं तेच करतात आणि निर्लज्जासारखी वागतात. बरं याचा त्यांना अजिबात पश्चात्ताप नसतो किंवा त्यांना काही फरक पडत नाही. पण अशावेळेस ते कोणाच्यातरी भावना दुखावतायत, कोणाचातरी अपमान करतायत, हे त्यांना कळत नाही.

सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका माणसाने अक्षरश: हद्दच पार केल्याचं दिसून येतंय. नेमकं असं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…

माणसाचा संतप्त व्हिडीओ व्हायरल (Shocking Video Viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका भींतीवर काही जण लघवी करताना दिसतायत. या भींतीवर वेगवेगळ्या प्रकारची चित्र रेखाटली आहेत. त्यात देव-देवतांची चित्रेदेखील आहेत. यातीलच एका चित्रावर एक माणूस लघवी करताना दिसतोय. तिथे लघवी करण्यास मनाई आहे असं लिहिलं असूनही तो माणूस कसलाच विचार न करता देवाचं चित्र असलेल्या भींतीवर लघवी करताना दिसत आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @_mona_lisa_5520 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला अशा लोकांना तुम्ही काय म्हणाल अशी कॅप्शन देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपला संताप व्यक्त केला आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया देत कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, अशा लोकांना तर नरकातही जागा मिळणार नाही. तर दुसऱ्याने “खूप मोठं पाप करताय तुम्ही लोक” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अरे, दोवाला तरी घाबरा”