दिल्ली मेट्रो नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असते. दिल्ली मेट्रोचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. बहुतेक व्हिडीओ प्रवासी बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी भांडतांना दिसतात तर कोणी विचित्र डान्स करतात दिसतात. सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ शूट करण्यास मनाई करण्यात आली असूनही अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता दिल्ली मेट्रोचा एका वृद्ध व्यक्तीच्या गाण्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. पण नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे कारण व्हिडीओमध्ये एक वृद्धव्यक्ती गाणे गात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये, एक वृद्ध व्यक्ती मोहम्मद रफीची गझल ‘मैने जज्बात निभाए हैं उसूलों की जगह’ गाताना दिसत आहे. ६० च्या दशकातील ही गाजलेली गझल गाता गाता काकांनी मेट्रोमध्येच संगीत मैफित रंगवली आहे. श्रोते म्हणून मेट्रोमधील प्रवासी काकांच्या गाण्याचा आनंद घेत आहे. मेट्रोच्या संपूर्ण कोचमध्ये शांतता पसरली. प्रत्येकजण तल्लीन होऊन त्याचे गाणे ऐकताना दिसत आहे. डब्यातील प्रत्येकजण त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत आहे.
हेही वाचा –“ज्योतिर्लिंग १२ नव्हे तर १४…..” हातात फलक घेऊन फिरणाऱ्या शिवभक्त तरुणाची पोस्ट चर्चेत
प्रवासी गाणे ऐकण्यात झाले तल्लीन
वापरकर्त्यांनी प्रशंसा केली @delhi.connection या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ओह हो, किती सुंदर गाणे आहे.” हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला असून त्याला लोकांची खूप पसंती मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत शेकडो लाईक्सही मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंटही केल्या आहेत. बहुतेक लोक त्याची स्तुती करताना दिसतात.
हेही वाचा – पुण्यात पोर्श प्रकरण चर्चेत असताना पुन्हा थरारक अपघात! वेगवान कारने महिलेला दिली जोरदार धडक, हवेत उडून… Video Viral
नेटकऱ्यांनी केले काकांचे कौतूक
एकाने लिहिले,”चला काहीतरी चांगले पाहू आणि ऐकू या. या गाण्यांमध्ये काहीतरी वेगळेपण आहे”
दुसऱ्याने लिहिले आहे, “हे विचित्र डान्स चांगले आहे.
तिसऱ्याने लिहिले, “जुन्या गाण्यांमध्ये काहीतरी खास आहे…खूप सुंदर”
चौथाने लिहिले,”मेट्रोची बदनामी करणाऱ्यांपेक्षा हे बरे.”
पाचव्याने लिहिले,”अप्रतिम काका, मस्त गाणे”
सहाव्याने लिहिले, जेव्हा दिल्ली मेट्रोमध्ये काहीतरी चांगले घडते”