काही गाणी अशी असतात जी पहिल्यांदा ऐकताच मनात घर करतात. मग जेव्हा कधी आपण ते गाणं परत ऐकतो तेव्हा मन प्रसन्न करतात. पण काही गाणी अशी देखील असतात जी दुःखद प्रसंग मांडणारी असतात, पण त्यातील संगीत आणि शब्द थेट हृदयाला भिडणारे शब्द आपलं मन जिंकतात. दुःखाशी निगडित असलं तरी ते गाणं ऐकून एक वेगळी शांतता मिळते. शेरशाह चित्रपटातील ‘मन भरेया’ हे गाणे याच प्रकारातील अत्यंत लोकप्रिय आहे. सध्या या गाण्याच्या एका वर्जनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा एक व्यक्ती ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘मन भरेया’ हे गाण गात आहे, त्यासह तो गिटारही वाजवत आहे. त्याचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. तिथे उपस्थित असणारे लोकदेखील त्याला साथ देतात, आणि रस्त्यावरच उत्तमरित्या गाण्याचे सादरीकरण होते. या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : गरीब माणसाने कुत्र्याला केलेली मदत पाहून नेटकरी झाले भावूक; पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ :

रणवीर ठाकूर या इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेल्या या व्हिडीओला २ कोटी ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये या गायकाच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.