सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण चांगलेच थक्क होऊन जातो. अनेकदा कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळत नाही आणि त्यांच्यातली कला हरवून जाते. काही लोक असेही असतात की त्यांना कोणत्याही व्यासपीठाची गरज नसते. ते कधीही कुठंही आपली कला सादर करतात. त्यांच्यातले कलागुण लपून राहत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर राहणारा एका गरीब व्यक्ती सुरेल आवाजात गाणं गाताना दिसून येतोय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झाला की हा व्यक्ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गरीब आजोबा रस्त्यावर बसलेले दिसून येत आहेत आणि आपल्या मधुर आवाजाची लोकांवर एक वेगळीच जादू पसरवलीय. त्यांचा आवाज ऐकून नेटकऱ्यांनी त्यांचा हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत अक्षरशः डोक्यावर बसवलंय. गाणं गात असताना हे आजोबा आपल्या हाताने वाद्य देखील वाजवताना दिसत आहेत. संपूर्ण ताल, चाल आणि लयीत गाणे म्हणत या आजोबांना सोशल मीडियावरील लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्यांची गाणी ऐकून कोणीही मंत्रमुग्ध होऊ शकतो. आजोबांच्या या व्हिडीओवर नेटिझन्सच्याही खूप प्रतिक्रिया येत आहेत.

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीची गुपचूप शिकार करणार होती सिंहीण, पण संपूर्ण डावच उधळला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Viral Video : पाणी पिण्यासाठी आलेल्या जग्वारला दिसला अजगर, पुढे जे झालं ते पाहून हैराण व्हाल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की एवढी मोठं टॅलेंट रस्त्यावर का वाया घालवत आहेत? comedynation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. “हे खरं टॅलेंट आहे” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘आणि भारतीय कच्चा बदामसाठी वेडे आहेत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘आता हा माणूसही स्वत:ला सेलिब्रिटी समजेल. जेव्हा सोशल मीडियाच्या शक्तीचा गैरवापर होईल.” अशाच प्रतिक्रिया या व्यक्तीच्या व्हिडीओवर येत आहेत.

Story img Loader