Viral Video Of Man’s Funny Sneeze: सोशल मीडियावर दररोज अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात; जे तुमचे मनोरंजन करण्यासाठी पुरेसे आहेत. अगदी ठरवून शूट केलेल्या कन्टेन्ट क्रिएटरच्या रील्सपासून ते योगायोगाने कॅमेऱ्यात टिपलेल्या सामान्य नागरिकांच्या क्षणांचा यात समावेश असतो. नुकताच एका माणसाचा सार्वजनिक ठिकाणी शिंकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय हसण्यासारखं आहे? शिंकणे ही एक सामान्य गोष्ट असली तरीही ती आज सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. कारण- माणसाच्या शिंकण्याचा आनंददायक आवाज कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे नेटकऱ्यांना पोट धरून हसण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चहाच्या टपरीजवळ एक माणूस हातात कप घेऊन चहाचे सेवन करतो आहे. काही सेकंदांनंतर तो शिंकतो आणि त्या शिंकण्याचा आवाज कर्कश म्हणजे जणू काही ॲनिमेटेड आवाज वाटतो. त्यानंतर काही सेकंदांनी तो पुन्हा चहा पिण्यास सुरुवात करतो. काही क्षणांनंतर तो पुन्हा शिंकतो आणि तसाच आवाज येतो. त्याच्या मागे उभी असलेली एक स्त्री हे ऐकून हसताना दिसते. त्या माणसाने शिंकताना नक्की कसा आवाज काढला ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…हौसेने सायकल बनवणाऱ्या ‘त्यांचा’ हा VIDEO पाहा; व्यायाम अन् फोल्डसुद्धा करू शकता; आनंद महिंद्रा कौतुक करत म्हणाले, ‘तुमच्या एनर्जीला…’

व्हिडीओ नक्की बघा…

आपल्यातील अनेक जण अगदीच हळू आवाजात, कोणालाही कळणार नाही किंवा ऐकू जाणार नाही अशा रीतीने शिंकतात. याउलट अनेक जण खूप मोठ्याने, अगदी आजूबाजूला राहणाऱ्यांनाही ऐकू जाईल इतक्या मोठ्याने शिंकतात. ही नैसर्गिक गोष्ट असते आणि त्यामुळे त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते, असे म्हणायला हरकत नाही. आज असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि एका अज्ञात माणसाच्या शिंकण्याच्या मजेशीर आवाजाने सगळ्यांनाच हसायला भाग पाडले.

नेटकऱ्यांना आठवलं टॉम अँड जेरी कार्टून:

तेथे उपस्थित काही अज्ञात व्यक्तींनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर तो @whatthe.duck__memes या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर केला. नेटकरी हा व्हिडीओ पाहून अनेक मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. एक युजर म्हणतोय, “शिंका आल्यावर कपमधला चहा न सांडणे म्हणजे टॅलेंटच आहे.” काही नेटकऱ्यांनी माणसाच्या विचित्र शिंकण्याच्या आवाजाची तुलना कार्टूनशी केली. ते म्हणाले, “आता समजलं की टॉम अॅण्ड जेरीचा आवाज कोण काढायचं.” तर काही युजर्स “ऑटो-ट्यून शिंका”, असेसुद्धा माणसाच्या शिंकण्याच्या स्टाईलला म्हणाले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने सगळ्यांनाच पोट धरून हसायला भाग पाडले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of man sneezing in public has everyone attention because the hilarious sound he made watch ones asp