Viral Video | Man stuck his mobile phone on Mumbai Local door: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो प्रवासी या लोकलमधून प्रवास करतात. या धावपळीच्या जीवनात अनेक जण या जीवनवाहिनीवर अवलंबून असतात. मुंबई लोकलमध्ये लाखो प्रवासी प्रवास करत असल्याने रोज काही ना काही नवीन घटना घडत असतात. अशातच अनेकदा मुंबई लोकलमधील भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे डान्स, गाणी अशा विविध कलांचं प्रदर्शनही लोकलमध्ये पाहायला मिळतं बरं का!

लोकलमध्ये चोरीच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. खिशातून कोणी पाकीट मारून नेतं तर कधी दरवाजाजवळ फोन वापरताना बाहेरून काठीने मारून तो फोन पाडला जातो आणि त्याची चोरी केली जाते. पण, आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात या पठ्ठ्याला फोन चोरीला जाण्याची, हरवण्याची किंवा पडण्याची जणू भीतीच उरली नाहीय. या पठ्ठ्याने चक्क ट्रेनलाच फोन चिकटवला आहे.

हेही वाचा… रीलसाठी केली हद्द पार! भररस्त्यात झिंज्या उपटणारं भांडण पाहून तरुणीने शूट केला VIDEO; संतप्त नेटकरी म्हणाले,“दररोज असे फालतू…”

व्हायरल व्हिडीओ

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत लोकल भरगच्च भरलेली दिसतेय. त्यात दरवाजात उभे असणारे प्रवासी आहेत. अशातच एका अतरंगी प्रवाशाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

लोकलमध्ये गर्दी असल्याने आपण आपल्या वस्तू सांभाळून खिशात किंवा बॅगेत ठेवतो. पण, या माणसाने चक्क आपला फोन ट्रेनला चिकटवून ठेवला आहे. व्हिडीओत आपण पाहू शकता की, माणसाने इअरफोन्स लावले आहेत आणि तो गाणी ऐकतोय, पण त्याचबरोबर या पठ्ठ्याने चक्क त्याचा फोन लोकलच्या बाहेरच्या बाजूला चिकटवला असल्याचं दिसत आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

‘bandrabuzz’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ शेअर करण्यात आला आहे. “वांद्रे स्थानकावरील प्रवासी आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी एका व्यक्तीचा स्मार्टफोन वेगळ्याच पद्धतीने ट्रेनच्या बाहेरच्या बाजूला अडकवला होता आणि तो गाणी ऐकत होता”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं गेलं आहे.

हेही वाचा… “सरकारला लाज वाटली पाहिजे”, चक्क ॲल्युमिनिअमच्या भांड्यात बसून आजारी वयोवृद्ध महिलेने पार केला ओढा; VIDEO पाहून नेटकरी संतप्त, म्हणाले…

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “डब्बा लगेज, अंकल सेवेज” तर दुसऱ्याने “असं फक्त मुंबई लोकलमध्येच घडतं” अशी कमेंट केली आहे. “कदाचित फोनच्या मागे मॅग्नेट असेल” असे तर्कवितर्क लावायलादेखील अनेकांनी सुरुवात केली.