Viral Video : काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. मग स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत; मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. असाच एका तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये तो चक्क ट्रकमध्ये झोपाळा बांधून झोका घेतोय.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक काय करतील याचा नेम नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण चक्क चालत्या ट्रकमध्ये मागच्या बाजूला दोन्ही बाजूनं दोरी बांधून, त्यावर बसून झोका घेत आहे. त्यामध्ये त्याच्या जीवाला धोका आहे. कारण- तो चालत्या ट्रकमधून तोल जाऊन पडण्याचीही शक्यता आहे. मात्र, हा तरुण न घाबरता जोरजोरात झोके घेत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचं हा तरुण लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक जण त्याच्याकडे पाहत आहे. दुपारच्या भरउन्हात चालत्या ट्रकमध्ये तरुणाचा हा प्रताप सुरू आहे.

a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: नरेंद्र मोदी आठवड्यातून दोनदा स्वतः बनवतात शेवग्याचे पराठे; म्हणाले, “माझी रेसिपी मी..”

हा व्हिडीओ रस्त्यावरून जाणाऱ्यांपैकीच कुणीतरी रेकॉर्ड करून, तो आता व्हायरल झाला आहे. अनेक महाभाग प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीवदेखील धोक्यात टाकतात. त्यापैकी काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात; तर काहींना जन्माची अद्दल घडते. badboy_6278m नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वारंवार अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात; मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही हेच खरं.

Story img Loader