Viral Video of man tied stool to legs in waterlogged road: सध्या अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. कधी कधी अतिवृष्टी झाल्यानं काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठतं. रस्त्यात खड्डे असल्यानं किंवा ओबडधोबड रस्ते असल्यानं पाणी साठण्याचं प्रमाण वाढतं आणि नागरिकांची गैरसोय होते.

पावसाळ्यात कधी ट्रेन उशिरा येतात, तर कुठे पाणी तुंबतं. अशा वेळेस घराबाहेर पडणंही कठीण होऊन जातं. परंतु, नोकरदार माणसाला काहीही करून घराबाहेर पडावंच लागतं. मग पाण्यानं तुडुंब भरलेल्या रस्त्यांवरून जाण्यासाठी काही लोक अनेक जुगाड करतात आणि अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेळोवेळी व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर उत्सुकतेनं पाहिला जातोय.

Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
police crack double murder case in savare village of palghar taluka
पालघर : घरगुती वादातून माय लेकीची निर्घुण हत्या; आरोपी दिर आणि नणंद यांना अटक
Dombivli West, illegal building, land mafias, demolition notice, municipality, Prakash Gothe, Shankar Thakur, encroachment control,
जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस, इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Potholes on internal roads due to rain in Pimpri city Pune news
पिंपरी: रस्त्यांची पुन्हा चाळण, यापुढे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर…
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हायरल झालेला हा व्हिडीओ भारतातला नसून परदेशांतला आहे. या व्हिडीओत रस्ता पाण्यानं तुडुंब भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या भरलेल्या पाण्यात आपले पाय भिजू नयेत आणि शूज खराब होऊ नयेत यासाठी एका व्यक्तीनं एक जुगाड म्हणजेच मजेशीर उपाय शोधून काढलेला दिसतोय.

हेही वाचा… Viral Video: “रागावतो माझ्यावर बाप माझा, त्याला माहित्येय की..”, दुसऱ्याला आनंद देताना भरउन्हात उभ्या पितापुत्रांचा व्हिडीओ पाहून पाणावतील डोळे

या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस छत्री घेऊन रस्त्यावर तुडुंब भरलेल्या पाण्यात चालतोय. पण, या सगळ्यात पाय आणि शूज स्वच्छ राहावेत यासाठी या गृहस्थानं आपल्या पायांनाच दोन टेबलं बांधून घेतल्याचं आपण पाहू शकतो. एक एक पाऊल सावकाश पुढे टाकत, तो त्या पाण्यातून चालताना दिसतो. इतक्यात एका टेबलावरून त्याचा पाय घसरतो आणि तो छत्रीसकट खाली कोसळतो.

‘आता त्याला कळलं असेल की, ही कल्पना काही योग्य नव्हती’, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. ‘Sach Kadwa Hai’ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा… Rose Flower Tips: गुलाबाच्या रोपाला पटापट कळ्या येण्यासाठी हळदीचा हा सोपा उपाय करून पाहा; पैसे वाचवणारा जुगाडू VIDEO

व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. एक जण कमेंट करीत म्हणाला की, “हा नक्कीच गणिताचा शिक्षक असणार.”

दरम्यान, पावसाळ्यात असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु, पावसाने जोर धरला असेल आणि अशा प्रकारे पाणी साठलं असेल, तर असे जुगाडू उपाय करणं प्राणघातकदेखील ठरू शकतं.