काही जणांना स्टंट करण्याची फारच हौस असते. आपल्याला झेपत नसलं तरी ते काम करायचं आणि मग ते काम जमलं नाही की स्वतःची फजिती करून घ्यायची ही सवयच असते काही लोकांना. असे लोक आपली हौस पूर्ण करायला जातात आणि तोंडघशी पडतात. हौसेला मोलं नसतं हे जरी खरं असलं तरी त्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी बिघडल्या की सर्वांसमोर हसू होतं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जंगल परिसरात मोठ्या स्टाईलमध्ये स्लाईड मारण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडीओची सुरुवात पाहून पुढच्याच क्षणी त्या मुलासोबत काही वाईट होणार आहे, असं वाटतंही नाही. पण काही सेकंदांनंतर समोर येणारी दृश्यं खरोखरच भितीदायक आहे. जंगल परिसरात स्लाईड मारताना सुरूवातीचा त्याचा कॉन्फिडन्स वाखाणण्याजोगा आहे. पण स्लाईडच्या अगदी जवळ येताच त्याचा स्लाईडवरील नियंत्रण बिघडतं आणि थेट स्लाईडवरून कोसळून पुढे जमिनीवर तोंडावर आपटतो.
आणखी वाचा : चालत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला अन् अचानक घडला मोठा चमत्कार, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : स्कूल बसमध्ये दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या विद्यार्थीनींचा VIDEO VIRAL
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण पोट धरून हसत आहेत. अनेकांना तर हसू आवरता येत नाही. व्हायरल माणसाचा व्हिडीओ अॅड्रेनालाईनब्लास्ट नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बघता बघता काही वेळातच सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एक व्यक्ती लिहितो, ‘मोठ्या विकेंडनंतर दररोजचा सोमवार असल्यासारखं वाटत आहे.’ दुसऱ्या युजरने चिंता व्यक्त करताना लिहिले, ‘आशा आहे की तो बरा असेल.’