कोणी कितीही श्रीमंत असो पण रस्त्यावर पडलेली नोट पाहून ती कोणालाही उचलावीशी वाटते. तुमच्यासोबतही असं अनेकदा घडलं असेलच. रस्त्यावर पडलेली नोट पाहून लोकांना वाटतं की ती फक्त त्यांनाच दिसते आणि दुसरं कोणीही तिचे दावेदार नाहीत. पण खरी परिस्थिती काही निराळीच असते. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती गाडीच्या चाकामध्ये एक नोट अडकलेली दिसत आहे. मग काय, ती व्यक्ती वेगवेगळे जुगाड वापरून ती चाकामध्ये अडकलेली नोट काढण्यासाठी प्रयत्न करू लागते. ही नोट काढता काढता या व्यक्तीची जी फजिती होते ती मात्र पाहण्यासारखी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सगळ्यात मोठी गंमत म्हणजे या व्यक्तीला असं वाटतं की फक्त त्याने एकट्यानेच ही नोट पाहिली आहे आणि मग गाडी निघण्याची वाट पाहू लागलो. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, तो माणूस आधी गाडीच्या चाकामधून नोट खेचतो, पण त्याचा हा प्रयत्न फसतो. नंतर, तो पुन्हा गाडीला ढकलण्यासाठी सुरुवात करतो, पण त्याचं इथेही काही चालत नाही. मग शेवटी दमून तो समोरच्या रेस्टॉरंटमध्ये रिकाम्या खुर्चीवर बसतो आणि विचार करू लागतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सारा अली खानच्या ‘चका चक’ गाण्यावर नवरीचा बहिणीसोबत धांसू डान्स; पाहा हा शानदार व्हिडीओ

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : काय सांगता, चक्क विमानातून निघाली लग्नाची वरात…! चेहऱ्यावर मास्क लावून गाणं गात केला प्रवास

त्यानंतर कारमालक आपली कार सुरू करतो हे पाहून ही व्यक्ती आनंदी होते. पण गाडी पुढे सरकताच रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या सर्वांनी नोटा उचलण्यासाठी गर्दी केली. मात्र गेल्या बऱ्याच वेळापासून प्रयत्न करणारा व्यक्ती तिथेच बसून राहतो.

कार सुरू झाल्यानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून हा व्यक्ती खूपच आश्चर्यचकित होतो. रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या सर्वांच्या नजरा त्या नोटवर खिळल्या होत्या हेही त्याला माहीत नव्हतं. हा मजेदार व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. ‘ghantaa’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांना आपलं हसू आवरता येत नाहीय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पत्नीने दिलेलं गिफ्ट उघडताच तो भावूक झाला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले…, तुम्हीही व्हाल भावूक

हा व्हिडीओ लोकाना किती आवडलाय हे व्हिडीओच्या व्ह्यूज आणि लाइक्सवरून दिसून येत आहे. या व्हिडीओला केवळ सहा तासातच १.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of man who showed cleverness to take rupees stuck under tire see what happened next in omg video prp