Viral video: एखाद्या गोष्टीप्रती असणारी आवड किंवा मग त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन याच्या आड कधी वयाचा आकडा येता कामा नये, हा सिद्धांत अनेकजण पाळतात. अशाच सिद्धांताचं पालन करणारी एक जोडी, सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. व्हायरल होणाऱ्या सर्वच गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. ही जोडीसुद्धा अशाच एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही काका-काकुंना देखील भन्नाट मराठी गाण्यांवर भन्नाट डान्स करताना पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या उत्साहानं त्यांनी डान्स केलाय तो पाहून खरंच तुमचेही पाय आपोआप थिरकू लागतील.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काका-काकुंनी ”हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे” या गाजलेल्या मराठमोळ्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत लग्नातील डान्सचा कार्यक्रम दिसून येत आहे. याच कार्यक्रमात एक कपल डान्स करताना दिसत आहे, मात्र हे कपल नवीन नवरा-नवरी नसुन एक काका-काकू आहेत. गाण्यांच्या बोलासोबत अगदी त्याला जुळतील अशा पद्धतीने डान्स स्टेप्स काका-काकू करत असतात. शेवट देखील भन्नाट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा. हा व्हिडिओ तुम्हाला देखील नक्की आवडेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यांसारखे अनेक काका-काकुंच्या डान्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण हा व्हिडिओ काही हटकेच आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या mansi.gawande.73 इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हृदयी वसंत फुलताना हे अत्यंत लोकप्रिय गाणं आहे. १९८९ साली अशी ही बनवाबनवी या चित्रपटातून हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं होतं. अन् तेव्हापासून आज २०२४ सुरू आहे, मात्र ३५ वर्षानंतरही हे गाणं लागताच लोकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. यावरून या गाण्याची जादू आपल्या लक्षात येईल. व्हिडीओमध्ये देखील तुम्ही पाहू शकता, नाचताना हॉलमधील प्रेक्षकही टाळ्या आणि शिट्टया वाजवत थिरकताना जाणवत आहेत.