Shocking Video: कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. माणसावर वाईट वेळ आली किंवा वाईट परिस्थिती ओढवली, तर जमेल ते काम माणूस करतो. पोटाची भूक भागवण्यासाठी आणि दोन वेळचं जेवण मिळावं यासाठी लोक आवड नसतानाही ते काम करतात. आपल्या पोटापाण्यासाठी अनेकजण अशी काम करायला तयार होतात जिथे आदरच मिळत नाही. अशा कामांमध्ये ते अनेकदा लोकांची बोलणी ऐकून, अपमान सहन करूनही मूग गिळून गप्प बसतात आणि हे सगळं सहन करत असतात. पण नाईलाजास्तव त्यांना ते काम करावं लागतं.

पण, काही लोक या परिस्थितीचा गैरफायदा घेतात आणि अशा माणसांचा छळ करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये स्टेजवर काही माणसांनी तरुणीबरोबर असं कृत्य केलं, जे पाहून सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तरुणीबरोबर केला अश्लीलपणा (Vulgar Act with Woman on Stage)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी अत्यंत चुकीची वागणूक मिळत आहे. ही महिला एका ठिकाणी कार्यक्रमासाठी आली असल्याचं दिसून येतंय. या कार्यक्रमामध्ये दोन पुरूष तिच्याजवळ जाऊन तिला अश्लील स्पर्श करताना दिसतायत.

तसंच एक माणूस तिथे येऊन तिच्यावर पाणी ओततानादेखील या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. हा धक्कादायक प्रकार तिथे जमलेल्या सगळ्या लोकांसमोर सुरू आहे. परंतु पुरूषांच्या अशा वर्तनावर कोणीच आवाज उठवताना दिसत नाही आहे. तसंच ती महिलादेखील हा अन्याय सहन करताना दिसतेय. दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलं नाही.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @dp_nimku_official या अकाउंटवरून व्हायरल झाला असून पोटासाठी काय काय करावं लागतं अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ५.५ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकलं नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तिला पण कळत नाही का काय करायचे ते” तर दुसऱ्याने “तिची मजबूरी असेल पण माणसं किती माजली आहेत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जबाबदारी ही खूप वाईट असते ज्यांच्यावर ती आली आहे त्यालाच कळते.”