Viral Video of minors Dangerous Skating Stunt: अल्पवयीन मुले सोशल मीडियावर काही लाइक्स आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी धोकादायक स्टंट करून आपला जीव धोक्यात घालत आहेत. असाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर आला असून, सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, तीन अल्पवयीन मुले एका वेगवान ऑटोरिक्षाच्या मागे स्केटिंग करीत, त्या रिक्षाला पकडून स्टंट करीत आहेत. ही मुले एवढी मोठी जोखीम घेऊन सोशल मीडियावर रील्स बनवताना दिसतात.

The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल

हा व्हिडीओ ‘TRUE STORY’ या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “अपघात झाला, तर याला जबाबदार कोण? अल्पवयीन मुले आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर स्केटिंग करीत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यावर धावत्या ऑटोच्या मागे स्केटिंगचा स्टंट केला जात आहे. तीन अल्पवयीन मुले स्टंट करताना रील्स बनवीत आहेत. जर काही अनुचित घटना घडली, तर ती चूक या रिक्षाचालकाचीच असेल, असे म्हटले जाईल. यापूर्वी थारमधील अल्पवयीन मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एक मुलगा TharROXX कारबरोबर स्टंट करताना दिसला होता,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

हेही वाचा… पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ७५ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी स्वत:च्या जीवाची लावली बाजी; VIDEO पाहाच

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा व्हिडीओ बांगलादेशचा असल्याचे स्पष्ट केले आहे. या व्हिडीओमुळे दर्शकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. परिस्थिती केवळ मुलांसाठीच नाही, तर रस्त्यावरील इतर वाहनचालकांसाठीही अत्यंत धोकादायक आहे. जर एखादे वाहन मागून वेगात आले, तर धडकेने एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते किंवा प्राणहानीही होऊ शकते.

अशा घटना आधीही अनेकदा घडल्या आहेत. अल्पवयीन मुले असे स्टंट करून स्वत:च्या जीवाशी नाहक खेळ करतात. सोशल मीडियावर काही लाइक्स, कमेंट्स व ट्रॅक्शनसाठी ही मुले कोणत्याही थराला जाऊन पोहोचतात.

हेही वाचा… लखनऊमध्ये चाललंय काय? कारच्या सनरूफवर कपल्सचा खुलेआम रोमान्स, एकमेकांना किस केलं अन्…, VIDEO झाला VIRAL

व्हिडीओमध्ये रस्ते सुरक्षा आणि वाहनचालक व पादचारी दोघांच्याही जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे असे धोकादायक वर्तन रोखण्यासाठी पालक आणि अधिकाऱ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

युजर्सच्या कमेंट्स

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एक युजरने कमेंट करीत लिहिलं, “रील बनवण्याच्या नादात तरुण रोज मृत्यूला कवटाळत आहे.” दुसऱ्याने, “या कृत्यासाठी त्यांचे पालक जबाबदार असतील आणि त्यांच्या मृत्यूसाठी ते स्वत:च जबाबदार असतील”, अशी कमेंट केली.