Viral Video Of Desi Jugaad : घरात आई एकमेव अशी व्यक्ती असते जी कधीच कोणती गोष्ट वाया जाऊ देत नाही. प्रत्येक गोष्टीत तिला एक अनोखा जुगाड सुचतो. रात्रीची भाजी उरली असेल तर सकाळी त्याचा पराठा करून देणार. तुमच्या जुन्या कपड्यांना भांडीवालीकडे देऊन घरात एखादी उपयोगी वस्तू घेऊन येणार. अशा अनोख्या पद्धतीत आई नेहमीच घरात सगळ्या गोष्टी सांभाळून घेत असते आणि लेकरांसाठी, कुटुंबातील सदस्यांसाठी धडपड करत असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
व्हायरल व्हिडीओ (Video) कॅनडाचा आहे. थंडी जाणवली की काहीतरी गरम आणि ताजे खावेसे वाटते. पण, हिवाळ्यात अन्न थंड होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. एका कंटेंट क्रिएटर जोडप्याने इन्स्टाग्रामवर याचसंबंधित एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये कंटेंट क्रिएटर जोडप्याने कॅनडाच्या थंड हवामानात भारतीय अन्न उबदार ठेवण्यासाठी आईचा जुगाड सांगितला आहे. कंटेंट क्रिएटर म्हणतो की, कॅनडामध्ये थंडीत गरम जेवण घेऊन कसे फिरायचे? (कॅनडा के थंड में गरम गरम खाना लेके कैसे घुमा जाए) तेव्हा अज्ञात महिला म्हणते – थर्मास. तर नक्की हा जुगाड काय आहे, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
तर व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, कंटेंट क्रिएटर थर्मासचे झाकण उघडतो, थर्मासच्या आतमध्ये अॅल्युमिनियम फॉइल पेपरने गुंडाळलेले पराठे असतात. तसेच १४ अंश सेल्सिअस तापमानातही पराठ्यातून वाफ येताना दिसते आहे. हा पुरावा आहे की, अन्न अद्याप गरम आणि ताजे आहे. तर कंटेंट क्रिएटर आणि त्याच्याबरोबर असणारी अज्ञात महिला पराठे खाण्याचा आनंद घेतात आणि म्हणतात ‘काय हॅक आहे’, असे व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. आतापर्यंत तुम्ही थर्मासमध्ये चहा, कॉफी ठेवलेली पाहिले असेल, पण जेवण गरम राहण्यासाठी आईचा हा जुगाड खूपच अनोखा आहे.
ही खूप मस्त कल्पना आहे…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @waddupcanada आणि @wadduptales या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘माझ्या देसी आईसारखे कोणीच नाही आहे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून अनेक प्रश्न कमेंटमध्ये विचारताना दिसत आहेत आणि आईचे कौतुकदेखील करत आहेत. एका युजरने ‘आईने हे कसे केले मला सांगशील का, मी माझ्या मुलाला शाळेत जाताना दुपारचे जेवण अशा प्रकारे पॅक करून देते, मीसुद्धा नक्की ट्राय करेन, थँक यू काकू ही खूप मस्त कल्पना आहे’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.