मुंबईसारख्या शहरात प्लॅश मॉब हे काही आता नवं राहिलेलं नाही. सीएसटी स्टेशनवर अचानक ‘रंग दे बसंती’ हे गाणं वाजलं आणि बघता बघता सारेच जण या गाण्यावर थिरकू लागले. मुंबईतल्या या पहिल्या वहिल्या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता. त्या पहिल्या फ्लॅशमॉबनंतर मुंबईभर तरुणांपासून, सिनियर सिटीझन्सपर्यंत अनेक ग्रुप्स हा प्रयोग करून पाहू लागलेत. अशाच आणखी एका प्लॅश मॉबचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबईच्या रस्त्यावर तरूणी एकत्र येत ‘इन डा गेटो’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. मुंबईतल्या नरीमन पॉईंट टूडे इथे हा दमदार फ्लॅश मॉब करण्यात आला. मुंबईसारख्या शहरात, जगण्याच्या रोजच्या रहाटगाडग्यात, आपली संवेदनशीलता गंजत चालल्याचं हतबलपणे पाहाणं इतकंच हातात राहातं. बधीर करणाऱ्या रूटीनमध्ये अडकलेल्या मुंबईकरांना या तरूणींनी अचानक सरप्राईज करत हा फ्लॅश मॉब केला. गाण्यावर थिरकत जोशात नृत्याविष्कार तिथल्या तिथे सादर झाला. मुंबईसारखे शहर जे काहीतरी अघटीत घडल्याशिवाय एखादा सेकंदही कुणासाठी थांबयला तयार नसते, तिथल्या माणसांना या फ्लॅश मॉबने काही मिनिटे थांबायला भाग पाडले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.
आणखी वाचा : न्यूयॉर्कमधील सुंदर सनसेट टिपण्यासाठी लोकांनी वाहतूकच थांबवली, १० मिलियनहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडीओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘नरीमन पॉइंट टुडे, मुंबईकर.’ असं लिहित हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये लोक सुद्धा जे बाल्विन आणि स्क्रिलेक्सच्या ‘इन डा गेटो’ गाण्यातील आनंददायक बीट्सचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तसंच फ्लॅश मॉबमधील तरूणींच्या डान्स स्टेप्स पाहून त्याच फॉलो करत सामील होत असताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ८७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १, ८०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.
आणखी वाचा : …अन् खड्ड्यात पडले स्कुटीस्वार पती-पत्नी, हा धक्कादायक VIRAL VIDEO पाहून हादरून जाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
या व्हिडीओवर मुंबईकरांचं प्रोत्साहन वाढविणाऱ्या प्रतिक्रियांचा देखील अक्षरशः पाऊस पडतोय. एकाने कमेंटमध्ये लिहिलं की, “सर, तुम्ही निवृत्त झाल्यानंतर रविवारच्या दिवशी या रस्त्यावरची मजा लोक आठवतील… अप्रतिम व्हिडीओ.” दुसर्या युजरने लिहिले, “आश्चर्यकारक! भारतातील सर्वात मोठ्या बिझनेस हबमध्ये पावसाळ्यातील सकाळची अविश्वसनीय जादू जिथे तरुण त्यांचा रविवारचा दिवस म्यूझिक आणि डान्सने साजरा करतात!” तिसरा युजर म्हणाला, “अद्भुत सर, मुंबईत जन्मले, मोठे झाले आणि राहिलो पण इथेच, पण तुमच्यासारखे निर्णय घेताना कोणत्याही आयुक्ताला नागरिकांना सहभागी करून घेताना पाहिले नाही. सलाम. कृपया मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनच्या प्रमुखांना त्यांच्या बॉसप्रमाणे वागायला शिकवा.”