Viral Video Of Passenger : सकाळी उठायचं, अंघोळ, नाश्ता करून लेट होईल म्हणून धावत पळत जी ट्रेन, बस, मेट्रो भेटेल त्यात चढायचं आणि लेट मार्क लागण्याच्या आधी ऑफिसला पोहचायचं यासाठी प्रत्येक मुंबईकर धडपड असतो. कारण लेट मार्क लागला की पगारातून पैसे कापून जाणार ही भीती प्रत्येकाच्या मनात असते. त्यामुळे कितीही गर्दी असली तरीही काहीजण अगदी जीवाची पर्वा न करता बस आणि ट्रेनमधून लटकून प्रवास करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. ट्रेन, बस, मेट्रो, मोनोरेल आदी अनेक सेवा सुरु केल्यातरी ‘गर्दी’ हा प्रश्न काही केल्या सुटत नाही आहे. त्यामुळे ऑफिस, कॉलेजला जाणारे सगळेच धावत्या ट्रेनमध्ये चढून सीट पकडणे, ट्रेन आणि बसमध्ये लटकून प्रवास करणे असे चित्र दररोज मुंबईकरांचे दिसते आहे. तर आज असेच एक दृश्य रस्त्यावरून चालणाऱ्या अज्ञात व्यक्तीला दिसले. एक बस प्रवाशांनी भरलेली दिसते आहे आहे आणि यामध्ये काही प्रवासी अक्षरशः लटकून प्रवास करत आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

महाराष्ट्रात लोकसंख्या वाढत आहे (Viral Video )

अगदी पाच ते दहा मिनिटांच्या अंतर सोडून बस, ट्रेन व मेट्रो उपलब्ध असल्या तरीही काही जण घाईगडबडीत, लवकर पोहचण्याचा नादात जीवघेणा प्रवास करायला जातात. पण, आपण जिवंत राहिलो तर घरच्यांसाठी पैसे कमवून आणू ही गोष्ट ते विसरूनच जातात. आज व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, बस प्रवाशांनी भरलेली दिसते आहे. जागा नसूनही काही प्रवासी अगदी बसच्या दरवाजा आणि खिडक्यांना पकडून अगदी धक्कादायक प्रवास करताना दिसते आहे. चुकूनही एखाद्याचा तोल गेला तर त्या प्रवाशांचे काय झाले असते याचा अदांज बांधणे सुद्धा कठीण आहे; असे स्पष्ट दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mumbaikarakki या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘महिन्याच्या पगारातून पैसे कट होऊ नये, पूर्ण पगार मिळावा यासाठी चाललेली आयुष्याची धडपड’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रवाशांना खडेबोल सुनावताना दिसले आहेत. ‘आयुष्यात कितीही धडपड करा मिळणार तितकेच जितके नशिबात लिहिले आहे’, ‘परप्रांतीयांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही गत आहे’, ‘महाराष्ट्रात लोकसंख्या वाढत आहे’, हीच खरी दुनिया आहे’, ‘जीवन इतक सोपं नाहीये’; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.