Viral Video Of Samosa, Jalebi Party By Indians In London: नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदी अनेक गोष्टींसाठी भारतीय नागरिक परदेशात जातात. पण, हे नागरिक तेथे जाऊन सुद्धा भारतीय सांस्कृतिक वारसा जपताना , भारतीय सण उस्तवात साजरे करताना, भारतीय खाद्यपदार्थाची चव तेथील नागरिकांनाही चाखायला देताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये भारतीय नागरिकांच्या एका ग्रुपने लंडनच्या प्रतिष्टीत टॉवर ब्रिजजवळ एक खास कार्यक्रम आयोजित केलेला दिसतो आहे.

व्हायरल व्हिडीओ लंडनचा असून, भारतीय नागरिकांच्या एका ग्रुपने लंडनच्या टॉवर ब्रिजजवळ एक खास कार्यक्रम आयोजित केला होता; ज्यामध्ये समोसे, जिलेबी यांसारख्या पारंपरिक स्नॅक्सचा आनंद लुटण्यात आला आहे. भारतीय जिथे जिथे जातात तिथे तिथे एखाद्या सामान्य क्षणांचे एका खास उत्सवात रूपांतर करतात, असं काही युजर्स या व्हिडीओला पाहून म्हणत आहेत. लंडनच्या टॉवर ब्रिजजवळ भारतीय नागरिकांनी कशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केला आहे हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
devendra fadnavis on pune
Devendra Fadnavis Video: “पुणे बुद्धिमान लोकांचं शहर आणि बुद्धिमान लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये केलेलं विधान चर्चेत!

हेही वाचा…बैलगाडीतून मिरवणूक, डान्स अन्… विद्यार्थ्यांनी असा साजरा केला शिक्षकाचा निरोप समारंभ; गुरू-शिष्याचं प्रेम दाखवणारा ‘हा’ VIDEO पाहाच

व्हिडीओ नक्की बघा…

परदेशात भारतीय पदार्थांची क्रेझ :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, लंडनमध्ये एक खास, भारतीय पद्धतीत मेळावा भरला आहे; ज्यात सर्व वयोगटांतील भारतीय नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक एकत्र जमून एकमेकांना समोसे, जिलेबीचे वाटप करताना दिसत आहेत. अनेक उपस्थितांनी गळ्यात भाजपचे झेंडे घालून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शविला होता. हा व्हिडीओ एप्रिल महिन्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे; जो आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rajnandani_rns या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जलेबी विथ अ व्ह्यू”, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स म्हणत आहेत, “असंच कृत्य लंडनच्या रहिवाशांनी भारतात येऊन केलं असतं, तर भारतीय नागरिकांना ते चाललं असतं का.“ तर, काही युजर्स म्हणत आहेत, “प्रत्येक देशातील विविध परंपरा समजून घेऊन, त्यांना प्रोत्साहन द्या’ आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.

Story img Loader