ख्रिस्ती धर्मात ‘नन’ म्हटल्या की समोर उभी राहते ती वात्सल्य, प्रेमाची मूर्ती. शांत, प्रेमळ नेहमीच अदबीने बोलणारी आणि ईश्वराच्या मार्गावर चालणारी धार्मिक स्त्री. पण आयर्लंडच्या रस्त्यावर नागरिकांना मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळलं. वयाची ६० ओलांडलेल्या नन् एका पोलीस अधिकाऱ्यासोबत चक्क फुटबॉल खेळत होत्या. ननला फुटबॉल खेळताना पाहण्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तेव्हा प्रत्यक्षात हे चित्र पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला नसेल तर नवलंच.
या नन पोलिसांसोबत ‘किपी अपी’ खेळत होत्या. म्हणजे एकदा का फुटबॉल तुमच्याकडे आला की त्याला हाताचा स्पर्श न करता खांद्याने किंवा पायाने तो हवेत झेलवत ठेवायचा. आता तुम्ही अनेकदा असं करताना फुटबॉलरला पाहिलं असेलच तेव्हा हा प्रकार किती कठीण आहे हे वेगळं सांगायला नको. पण तरीही या ननने फुटबॉल खाली पडू न देता, पोलिसांसोबत जो काही सामना खेळला तो पाहण्यासारखाच होता. या ननचा उत्साहच इतका होता की या दोघांत रंगलेला सामना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी रस्त्यावर जमली होती. रस्त्यावर तर गर्दी होतीच पण सोशल मीडियावर देखील लोकांचा तुफान प्रतिसाद या व्हिडिओला पाहायला मिळाला. या व्हिडिओला १४ हजारांहून अधिक शेअर्स आहेत. तर अकरा हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे