Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी ट्रेण्ड होतात. येथे एखादी गोष्ट व्हायरल झाली की जगभरा पोहचते.इन्स्टाग्रामवरील रिल्सच्या माध्यमातून आपल्याला ट्रेण्ड समजतो. सध्या पुष्पा २ मधील ‘अंगारो सा’ गाणं चांगलच व्हायरल होत आहे. या गाण्यावर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्स करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये एक वृद्ध जोडपे ‘अंगारो सा’गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Viral Video of old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie video viral on social media)

आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला स्टेजवर आजोबा आजी सुंदर डान्स करताना दिसत आहे. पुष्पा चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘अंगारो सा’ गाण्यावर ते अप्रतिम असा डान्स करत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. ते खूप मनापासून त्यांच्या डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे. या वृद्ध जोडप्याचा डान्स पाहून काही लोकांना त्यांच्या आज्जी आजोबांची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा : Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral

choreo_anchor_neha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त इथपर्यंत कोणी साथ द्यावी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इंटरनेटवरील सर्वात गोंडस रील” तर एका युजरने लिहिलेय, “ज्या घरातील वृद्ध आनंदी असतात त्या घरात श्रीराम निवास करतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “नशीबवान असतात ज्यांना हा दिवस पाहायला मिळतो” एक युजर लिहितो, “किती सुंदर जोडी आहे” तर एक युजर लिहितो, “मला सुद्धा हा क्षण माझ्या नवरऱ्याबरोबर जगायचा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेक लोकांनी या वृद्ध जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader