Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ खूप भावनिक असतात. काही व्हिडीओ तर थक्क करणारे असतात. वृ्दध लोकांचे सोशल मीजियाव अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे वृद्ध लोक डान्स करताना दिसून येतात तर कधी गाणी म्हणताना दिसून येतात.पण तुम्ही कधी एखाद्या आजीला फोटोग्राफी करताना पाहिले का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी फोटोग्राफी करताना दिसत आहे. आजीची फोटोग्राफीची आवड पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
असं म्हणतात, आवड जपायला वयाचं बंधन नसते. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा. ही आजी सुद्धा तिची आवड जपताना दिसत आहे. आजीला फोटोग्राफी करताना पाहून तुम्हालाही तिचे कौतुक करावेसे वाटेल.
हा व्हायरल व्हिडीओ एका समु्द्र किनाऱ्यावरील आहे. समुद्रकिनाऱ्यावर फोटोशूट करायला सर्वांनाच आवडते. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की समुद्र किनाऱ्यावर एक आजी फोटोग्राफी करताना दिसत आहे. समुद्र किनाऱ्यावर आजी कुटूंबातील सदस्यांचे फोटो काढताना दिसत आहे. विशेष म्हणजे आजीने नऊवारी नेसली असून कपाळावर लाल कुंकू, डोक्यावर पदर आणि हातात हिरवा चुडा घातला आहे. मराठमोळ्या आजीच्या हातात कॅमेरा पाहून तुम्हालाही हा व्हिडीओ पाहावासा वाटेल. आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. फोटोग्राफी करताना आजीला खूप आनंद होताना दिसतोय. आजी खूप मन लावून फोटोग्राफी करताना दिसत आहे. खरं तर आजीपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. आवड जपताना वय कधीही आडवे येत नाही, असे या व्हिडीओवरुन तुम्हाला दिसून येईल.
gavakadachi_gost या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजर्सनी आजीचे कौतुक केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “कॅमेरामॅनला ग्रँड सॅल्यूट” तर एका युजरने लिहिलेय, “जग जिंकला भावा तू” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुख”