हौस म्हणजे आपल्या मनाची इच्छा पुरविणे. पण प्रत्येकाला आपली हौस पूर्ण करता येते असे नाही. कधी परिस्थिती अशी असते लोकांना हौस पूर्ण करण्याचा विचारही करत नाही. आपल्या रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणार्‍यांना हौस माहितच नसते पण संधी मिळाली तर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी आपल्या मनाची हौस पूर्ण केली पाहिजे. हीच गोष्ट एका आजींनी करून दाखवली आहे. सध्या लुगडं नेसून झीपलाईन राईडचा आनंद घेणार्‍या आजींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हौस पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन नसते. कोणत्याही वयात कोणीही हौस पूर्ण करू शकते. अशीच आपली हौस पूर्ण करणाऱ्या आजीबाईंचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये आजीबाईंनी झीपलाईन राईडचा आनंद घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी लुगडं नेसून झीपलाईन राईड पूर्ण केली आहे. आजीबाईंना उंची भिती नाही वाटत नाही की पाण्याची भिती वाटत नाही. आजीबाई बिनधास्तपणे राईडचा आनंद घेताना दिसत आहे. आजीबाईंनी राईडदरम्यान आपल्या डोक्यावरचा पदर देखील खाली पडू दिला नाही.

https://www.instagram.com/reel/DEmivg1o6dU/?igsh=dGF5YmhiNXl4ZXN4/

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. व्हिडिओ इंस्टाग्रामवरpriti_tuzi_mazi_10
नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”आयुष्यात एकदा तरी आपल्या मनाची हौस करून घ्यावी.”

आजीबाईंचा हा व्हिडिओ अनेकांना आपली छोटी मोठी हौस पूर्ण करण्याची प्रेरणा देत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of old leady enjoying zipline ride wear nauvari sadi netizen impressed snk