Pakistan viral video: भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाई थांबण्याचे काही नाव घेत नाही आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या खूपच वेगळ्या वळणावर आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागड्या आहेत. आपल्याला माहिती आहे की, पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतो. कधी महागाईमुळे तर कधी आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे तो चर्चेत येत असतो. आता पाकिस्तानातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचीही झोप उडेल. या घटनेमुळे पाकिस्तानचं पुन्हा जगभरात हसं झालं आहे.

तुम्ही कधी पायलटला उड्डाण करण्यापूर्वी त्याचे विमान साफ ​​करताना पाहिले आहे का? तुमचं उत्तर कदाचित नाही असंच असणार आहे. पण पाकिस्तानातून असाच एक प्रकार समोर आला आहे. शेजारी देश पाकिस्तान नेहमीच आपल्या विचित्र कारवायांमुळे चर्चेत असतो. पाकिस्तानमधून दररोज अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतात. अशा परिस्थितीत गरिबी आणि महागाईने होरपळत असलेल्या पाकिस्तानला आता आपल्या विमान कंपनीसाठी ट्रोल केले जात आहे. जिथे पायलट बस किंवा ट्रक असल्याप्रमाणे विमानाच्या खिडकीतून बाहेर येऊन विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाची विंडशील्ड साफ करत आहे. या व्हिडिओवरून जगभरात पाकिस्तानची कशी खिल्ली उडवली जात आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

पायलटने उड्डाण करण्यापूर्वी त्याचे विमान साफ ​​करताना पाहिले आहे का? तुमच्यापैकी काहीजण कदाचित विचार करत असतील की कॉकपिट किंवा विंडस्क्रीन साफ करण्याचं काम ग्राउंड स्टाफ किंवा स्वच्छता कर्मचारी काम करत असतील. पण इथे तर चक्क हा पायलटच स्वत:चा जीव धोक्यात घालून विमानाची विंडशील्ड साफ करत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” आजीपुढं नातीसुद्धा फिक्या; नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स

कंगाल पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा

काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता, त्यामध्ये पाकिस्तानातील कराची येथे उद्घाटनाच्या दिवशीच एक शॉपिंग मॉल लुटला गेल्याची घटना समोर आली आहे. ड्रीम बाजार’ नावाच्या स्टोअरच्या उद्घाटनाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. या दुकानातील प्रत्येक वस्तूची किंमत पाकिस्तानच्या ५० रुपयांपेक्षा कमी होती. एवढी कमी किंमत असूनही पाकिस्तानातील लोकांना ती परवडत नव्हती की काय, म्हणून पाकिस्तानी लोकांनी अवघ्या ३० मिनिटात हे दुकान लुटलं.