जगातील अनेक देशांना क्रिकेटच वेड मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे भारतात टी-20 चे सामने आयोजित जातात, त्याप्रमाणे जगभरात अनेक ठीकाणी वेगवेगळ्या नावांनी टी-20 चे सामने आयोजित करण्यात येतात. सध्या दक्षिण आफ्रिकेतही असेच T-20 सामने आयोजित केले आहेत. दक्षिण आफ्रिका 20 लीगमधील सनरायझर्स इस्टर्न केप संघाने १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत MI केपटाउन संघाला हरवलं आहे.

दक्षिण आफ्रिका T-20 लीगमधील या दोन संघामधील लढत ऐन रंगात आली असताना एक विचित्र घटना घडली, जी कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रिकेटचे सामने बघताना आपलं मनोरंजन करणाऱ्या अनेक घटना घडत असतात. शिवाय क्रिकेटचे थेट प्रक्षेपण होत असते त्यामुळे अनेक विचित्र घटनाही कॅमेऱ्यात कैद होतात, तर कधी कधी कॅमेरामन मुद्दाम अशा गोष्टींकडे कॅमेरा नेतात जे पाहून टीव्हीवर मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांचे मनोरंजन होईल.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट

हेही पाहा- Video: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सेल्फी काढण्याचा मोह नडला, इच्छा नसताना १५० किमीचा प्रवास घडला

सध्या अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये MI केपटाउनचे दोन क्षेत्ररक्षक जॅन्सेनने मारलेला चेंडू अडवण्यासाठी सीमारेषेकडे धावतात, यावेळी सीमारेषेच्या पलीकडे एका प्रशिक्षकाची मुलाखत घेत उभ्या असलेल्या पाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बासला जाऊन एक क्षेत्ररक्षक जोरात धडकतो. क्षेत्ररक्षकाने झैनाब अब्बासला जोराची धडक दिल्यामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही पाहा- भाकरी नळाला धुवून खाणाऱ्या आजोबांचा Video पाहून नेटकरी झाले भावूक; म्हणाले “परिस्थितीला कधीच…”

दरम्यान, खाली पडलेली पत्रकार उठून उभी राहते आणि आपण ठीक असून काही गंभीर दुखापत झाली नसल्याचंही सांगते. पण ही घटना कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ @mufaddal_vohra नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खेळाडूंचे लक्ष केवळ चेंडूवर असतं त्यामुळे बाहेर उभ्या राहिलेल्या लोकांनीच स्वत:ची काळजी घ्यायला हवी असा सल्लाही काही लोकांनी दिला आहे.