निसर्गातले असंख्य जाती-प्रजातींचे प्राणी-पक्षी खूपच क्युट असतात. त्यांचं दिसणं, चालणं, आवाज, ते करत असलेल्या विविध कृती हे सगळं अतिशय आकर्षक असतं. त्यातलाच एक प्राणी म्हणजे पांडा.
हे पांडा दिसायला अतिशय निरागस आणि गोड असतात. कुणाचंही लक्ष सहज त्यांच्याकडे वेधलं जातं. पांडा अगदीच लहान मुलांसारखं काय-काय गंमतीदार करत असतात. सोशल मीडियावर बऱ्याचदा पांडाजचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात पांडा जे करतो आहे ते पाहून तुम्ही त्याच्यावर एकदमच फिदा व्हाल.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडीपुढे आडवा आला महाकाय साप, मग या व्यक्तीने हाताने उचलून फेकला नेमकं त्याचवेळी…
हा पांडा अगदी माणसासारखं दातांनी ऊस तोडून खाताना दिसतोय. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडतो आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lalala.sohag नावाच्या युझरनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूप मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक पांडा ऊस घेऊन दातांनी कचाकच तोडून खातो आहे. व्हिडीओ पाहताना असं वाटत आहे, की त्याला खूप भूक लागली आहे.
आणखी वाचा : किंग कोब्राला किस करायला निघाला हा माणूस आणि मग पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : बंगळुरू विमानतळावर प्रवाश्यांनी गरब्यावर ठेका धरला, हा VIRAL VIDEO पाहाच
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. लोक या व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला २२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दीड हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या गुबगुबीत दिसणाऱ्या पांडाचं कौतुक करत आहेत. या भुकेल्या पांडाने लाखो लोकांना आपल्या प्रेमात पाडलंय.