भारतात एकापेक्षा एक सरस स्ट्रीट फूड्स मिळतात. मात्र आजकाल अनेकजण काहीतरी वेगळं करण्याच्या नावाखाली विचित्र प्रयोग करून पदार्थ तयार करताना दिसत आहेत. यापूर्वी कधीही न ऐकलेले पदार्थ पाहून कधी तोंडाला पाणी, तर कधी किळसवाणं वाटतं. प्रयोगाच्या नावाखाली खाण्याची हेळसांड करत असल्याची टीका अनेक जण करतात. असं असलं तरी या रेसिपी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात, हे मात्र तितकंच खरं आहे. ओरियो भजी, फँटा मॅगी, मोमोज पराठा या पदार्थानंतर आता पार्ले जी बर्फीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दिल्लीतील एका व्यक्तीने पार्ले जी बिस्किट वापरून बर्फी बनवली आहे. ही व्यक्ती पार्ले जी बिस्किटांमध्ये देशी तूप मिसळून बर्फी बनवताना दिसत आहे. रेसिपीच्या सुरुवातीला व्यक्तीने पार्ले जीची बिस्किटे देशी तुपात तळून घेतली. त्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवावी. नंतर एका भांड्यात दूध पावडर आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार केली. कढईत साखरेचा पाक करत असताना त्यात दूध पावडर आणि दुधाचे टाकून तापवलं. कढईतील द्रावण आटत आल्यानंतर बिस्किटाची पेस्ट शेवटी टाकतो. त्यानंतर एक ट्रे घेऊन त्यात बर्फी सेट करतो.
पार्ले जी बर्फी चवीला कशी आहे माहिती नाही. पण अनेक जणांनी हा व्हिडिओ पाहीला आहे. तसेच इतर सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही जणांनी या रेसिपीचं कौतुक केलं आहे, तर काही जणांनी टीका करत मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.