Ujjain railway station video: गर्दीच्या वेळी ट्रेनमध्ये चढणं ही एक कला मानली जाते. कारण क्षणाचाही विलंब न करता ट्रेनमध्ये उडी मारावी लागते. अन्यथा ट्रेन सुटलीच म्हणून समजा. अशा गर्दीत सीट मिळवायची म्हणजे काही सोपं काम नाही. भर गर्दीत एखाद्याला बसण्यासाठी जागा मिळाली तर त्याला आपण नशीबवान म्हणतो. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक नेंजा टेकनिक दाखवणार आहोत जी नशीबावर देखील मात करेल. होय, ही टेकनिक वापरून तुम्ही भर गर्दीत बसण्यासाठी सीट मिळवू शकता.भरगर्दीत ट्रेनमध्ये चढण्याची एका तरुणीनं वापरलेली निन्जा टेक्निक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा उज्जैन रेल्वे स्टेशनवरचा असून एक तरूणी ट्रेनमध्ये खिडकीतून चढताना दिसत आहे. ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी असल्यामुळे तिला दरवाज्यातून चढायला जागा नाही, म्हणून ती खिडकीतून धोकादायक पद्धतीने ट्रेनमध्ये चढली आहे. अशा स्टंटमुळे कधीकधी अपघात होऊ शकतात त्यामुळे बसने प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेतली पाहिजे. ‘ही कला बाहेर नाही गेली पाहिजे’ अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भर मंडपात नवरीच्या मागे लागला कुत्रा; लग्न अर्ध्यातच सोडून पळाली नवरी; VIDEO व्हायरल

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of passengers boarding overcrowded train through windowseat ujjain station srk