इंटरनेटवर आश्चर्यचकित करणाऱ्या व्हिडिओजची काही कमी नाही. कुठे विषारी सापांबरोबर व्यक्ती खेळ खेळतो आहे, तर कुठे एका फुड डिलिव्हरी बॉय जेटपॅकचा वापर करून उंच इमारतीवरून उड्डान करून फूड डिलिव्हरी करताना दिसून आला आहे. असाच एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोन व्यक्ती बॅट एवजी डोक्याने टेबल टेनिस खेळताना दिसून आले आहे.

@TheFigen_ नावाच्या ट्विटर युजरने हा हॉलिबॉल खेळाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात टेबल टेनिस खेळाच्या टेबलावर दोन व्यक्ती डोक्याने बॉल एकमेकांना पास करत असल्याचे आश्चर्यकारक दृष्य दिसून येत आहे. दोन्ही खेळाडू गोल होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खेळताना त्यांनी सर्व लक्ष बॉलकडे केंद्रित केलेले आहे. विशेष म्हणजे, त्यांची चपळता, चिकाटी ही वाखण्याजोगी आहे.

(रावनाच्या वेशातील व्यक्तीने हरयाणवी गाण्यावर धरला जबरदस्त ठेका, नेटकरी म्हणाले याला आदिपुरुषमधील या अभिनेत्याच्या जागी..)

दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त सामना सुरू आहे. दोन्ही एकापेक्षा एक असल्याचे दिसून येत असून जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेवटी लाट टीशर्ट घातलेला एक व्यक्ती बॉल पास करण्यात अपयशी होतो व त्याची हार होते. या आश्यचर्यकारक व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव झालेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३५ हजार लाईक्स मिळाले आहेत.

खेळाचे नाव काय? एक यूजर म्हणाला..

हा व्हिडिओ पाहून नेटकरी चकित तर झालेच आहेत, त्याचबरोबर त्यांनी गंमत देखील केली आहे. दोन सील पिंग पाँग खेळत असल्याप्रमाणे हा खेळ वाटतो आहे, अशी गंमत एका यूजरने केली आहे. तर एकाने हा खेळ हेड टेबल टेनीस आहे का? असा प्रश्न केला आहे. तर हा व्हिडिओ पाहून एका युजरने, म्हणून महिला पुरुषांपेक्षा अधिक काळ जगतात, असे मत व्यक्त केले आहे.

Story img Loader