सध्याच्या स्वार्थी युगात माणुसकी हरवत चालली आहे की काय, असं चित्र दिसून येत होतं. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये या गोष्टीला तिलांजली मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये कार अपघातात चालकावर “काळ आला होता..वेळ पण आली होती” मात्र माणुसकीने वेळीच एंट्री केल्याने “क्रूर वेळ” टळली अन योग्य वेळी मदत मिळाल्याने त्या चालकाचे प्राण वाचले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कारचा भयंकर अपघात घडला असून ती पलटी होऊन पडलेली आहे. पुरुषांचा एक ग्रूप अपघातानंतर उलटलेल्या कारला पलटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या दुर्घटनेत कारची अवस्था पाहून अपघाताची भीषणता दिसून येते. याच कारचा अक्षरश: चुराडा झाला. हा व्हिडीओ पाहताना काळजात धडकी भरते. ही कार पुन्हा चाकांवर आणण्यात आणि आत अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी आजुबाजूचे सगळे लोक एकत्र आले आणि कारला पलटी करण्यासाठी धडपड करू लागले. बऱ्याच वेळच्या अथक प्रयत्नानंतर सर्वांना कार पलटी करून आत अडकलेल्या चालकाला वाचवण्यात यश आले. कारमध्ये गंभीर अवस्थेत अडकलेल्या कार चालकाला ताबडतोब तिथल्या लोकांनी जवळच्या रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केलं. मात्र, चालकाची प्रकृती आता स्थिर आहे.
आणखी वाचा : हत्तीण बाळाला जन्म देत होती, कळपाने असा साजरा केला क्षण, VIRAL VIDEO एकदा पाहाच!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : दे टपाटप! भर मंडपात नवरा-नवरीमध्ये तुफान मारामारी, पार जमिनीवर लोळेपर्यंत रंगलं WWE
हा व्हिडीओ टेक्सासमधल्या सॅन अँटोनियोमधला असल्याचं सांगण्यात येतंय. इथल्या एका महामार्गावर हा भीषण अपघात घडला होता. ‘गुडन्यूज मूव्हमेंट’ नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ड्रायव्हरला वाचवल्याबद्दल नेटिझन्सनी बचावकर्त्त्यांचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिले, “‘टीमवर्क अशक्य ते शक्य करून दाखवते. देव त्यांना सर्व आशीर्वाद देईल.” या व्हिडीओमध्ये माणुसकीवरचा हरवत चाललेला विश्वास मात्र पुन्हा मजबूत झाला, हे मात्र नक्की.