सोशल मीडियावर दररोज नव नवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात तर काही व्हिडीओ हे आश्चर्यकारक असतात. असे व्हिडीओ पाहून कधी कधी स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास ठेवता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगा चक्क पक्ष्यासारखा हवेत उडू लागला. इतकंच काय तर भल्यामोठ्या समुद्रावर तो घारीप्रमाणे घिरट्या देखील घालू लागला. हे पाहून सारेच जण थक्क होऊ लागले आहेत. तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
असं म्हणतात की मानवांसाठी काहीही कठीण नाही. तो सर्वकाही तयार करू शकतो. माणसाने आता चक्क हवेत उडणारे उपकरणही तयार केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ याच्याशी संबंधित आहे. एका आगळ्या वेगळ्या मशिनची चाचणी सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही अनोखी मशीन एका व्यक्तीच्या पाठीवर बांधली जाते आणि त्याच्या हातात एक हँडल आकाराचे वाद्य दिलं जातं. ती व्यक्ती पूर्ण जोर देते की तो जमिनीवर राहतो. पण मशीन त्याला हळुहळु हवेत खेचतो. मशीन सुरू झाल्यानंतर काही वेळातच तो व्यक्ती हवेत उडतो आणि बघता बघता समुद्रावर पक्ष्याप्रमाणे घिरट्या घालू लागतो.
एखादा चमत्कारच वाटेल असे हे दृश्य पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. उंच आकाशात बिनधास्तपणे हा व्यक्ती मनसोक्त उडण्याचा आनंद लुटताना दिसून येत आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती दिसून आली नाही. या व्यक्तीला उडताना पाहून आसपासचे सगळे लोक हैराण झाले.
आणखी वाचा : सिनेमातला सीन नव्हे, रिअल लाइफ मर्दानीचा खरा VIDEO VIRAL; ७३ वर्षीय आजीने एकटीने चोराला पडकलं
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : फुल टाईम जॉब करणारी ही बेघर महिला कारमध्येच राहते, जिममध्ये अंघोळ करते, पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ beautiffulearth नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. “तुम्हाला पण हे करायला आवडेल का?” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडिओ अमेरिकेत शूट करण्यात आला आहे. तो किती व्हायरल होत आहे, याचा अंदाज त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजवरून लावता येतो. या व्हिडीओला आतापर्यंत १२ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
आणखी वाचा : टांझानियातील ‘त्या तरूणाची गोविंदा स्टाईलमध्ये डायलॉगबाजी, पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ पाहून लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. एका व्यक्तीने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं की, “अचानक मशीनने काम करणं बंद केलं तर?” काही युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट करताना त्यांना सुद्धा असा अनुभव घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काही युजर्सनी यात रिस्क असल्याचं सांगत मनातली भीती व्यक्त केली आहे.