कुत्र्यासाठी मंदिर कोण बांधतं का? असेच उद्गार तुमच्या तोंडून येत असतील. पण हे खरंय. तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
आपल्याकडे माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांना देखील कुटुंबाचा सदस्य समजलं जातं. त्यांच्यावरही त्या कुटुंबातील सदस्यांचा तितकाच जीव असल्याचं पाहायला मिळतं. आपण भारतीय फार श्रद्धाळू असतो. आपण देवी देवतांची मंदिरे तर पुष्कळ पाहिली असतील, पण भारतामध्ये एक मंदिर असं आहे जिथे देवी देवतांची नव्हे, तर कुत्र्याची पूजा होत असते. यावर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
जगभरातील बहुतेक व्यक्ती त्यांच्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करतात. ते त्यांच्या पाळीव प्राण्यांची खूप काळजी घेतात आणि त्यांच्यावर आपल्या मुलांसारखे प्रेम करतात. पण जेव्हा त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत काही दुर्घटना घडते किंवा त्यांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांना हा धक्का सहन होत नाही. सोशल मीडियावर सध्या जी बातमी समोर आली आहे ती याच संबंधित आहे. तामिळनाडूतील शिवगंगा इथे एका ८२ वर्षीय आजोबांनी आपल्या पाळीव कुत्र्याचं मंदिर बांधलंय.
आणखी वाचा : गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे भांडण सोडवण्यासाठी गेला होता डिलिव्हरी बॉय, पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO
कुत्र्यासाठी मंदिर कोण बांधतं का? असेच उद्गार तुमच्या तोंडून येत असतील. पण तामिळनाडूच्या ८२ वर्षीय मुथूने आपल्या पाळीव कुत्र्याच्या स्मरणार्थ मंदिर बांधलंय, हे खरंय. तमिळनाडूतील शिवगंगा इथे त्यांनी त्यांच्या शेतावर मंदिर बांधलंय. मुथू गेल्या ११ वर्षांपासून त्यांचा पाळीव कुत्रा टॉमसोबत राहत होते, टॉमचा गेल्या वर्षी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या आठवणीत या आजोबांनी हे कुत्र्याचं मंदिर बांधलंय. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : Ganesh Temple Street : अमेरिकेतही बनली ‘गणेश मंदिर गल्ली’, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : रुग्णवाहिकेच्या मागे तब्बल ५ मैल धावत राहिला घोडा, का ते जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO एकदा पाहाच
आता ही सामान्य गोष्ट आहे की आपण एखाद्या व्यक्तीसोबत जास्त काळ राहिलो तर आपोआप जवळीक निर्माण होते. तमिळनाडूच्या मुठेच्या बाबतीतही असंच घडलंय. दोघेही ११ वर्षे एकत्र राहिले. पण कुत्रा मेला तेव्हा ते पूर्णपणे तुटले. पण आता शेतात आपल्या पाळीव कुत्र्याचं मंदिर करून त्याची आठवण काढत असतात. या मंदिराच्या उभारणीसाठी केवळ ८० रुपये खर्च झाल्याचं सांगण्यात येत आहे. मंदिर बांधणारे आजोबा मुथू हे सरकारी कर्मचारी होते जे आता निवृत्त झाले आहेत.