Viral Video of Police arrested 24 men for doing a stunt in Bangalore: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ संताप येणारे असतात. अनेकदा काही लोक मजा म्हणून जीवावर बेतेल असे स्टंट करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. अशा अनेक घटना आपण याआधी पाहिल्या आहेत. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत काही लोक त्यांच्या स्कूटरवरून स्टंट करताना दिसतायत.
बेंगळुरू येथील रस्त्यावर २४ जण धोकादायक स्टंट करताना दिसले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बेंगळुरू पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि त्या सर्वांना ताब्यात घेतले. पोलिस विभागाच्या अधिकृत एक्स हँडलने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये बेंगळुरूमधील काही लोक स्टंट करत असल्याचे दिसत आहे. पण, हा स्टंट त्यांच्यावर भलताच महागाचा पडला आहे; कारण या स्टंटनंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असंदेखील या व्हिडीओमध्ये दिसून येतंय.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
व्हिडीओमध्ये भररस्त्यात काही लोक स्टंट करताना दिसतायत. ‘व्हीलिंग’ हा एक प्रकारचा स्टंट आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्कूटरचा पुढचा भाग उचलते आणि दुसऱ्या चाकावर संतुलित करते आणि अशाप्रकारचे जीवघेणे कृत्य हे लोक भररस्त्यांवर करताना दिसत आहेत. या स्टंट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार केल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी २४ जणांना अटक केली. याशिवाय दोन तरुणांवर कारवाई करून १८ वाहने जप्त करण्यात आली.
हा व्हिडीओ १७ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून या व्हिडीओला ८२,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेक लोकांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर केल्या.
हेही वाचा… शिक्षक झाला हैवान! चिमुकल्या विद्यार्थिनीला कानातून रक्त येईपर्यंत मारलं, धक्कादायक VIDEO आला समोर
युजर्सचा संताप (Users Comments)
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा प्रकारची कारवाई करूनही दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालले आहेत. काहीतरी वेगळं करायला हवं.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “या मूर्खांना अटक करून किमान १० दिवस तुरुंगात टाका.”
“त्यांना किमान ५०,००० रुपये दंड करा, तरच ते पुन्हा कधीही त्यांच्या बाईकला हात लावणार नाहीत. दुर्दैवाने घटनात्मक कायदा याला परवानगी देत नाही”, अशी कमेंट एका युजरने केली.” तर एक जण म्हणाला, “बाईकच्या मागे नंबरप्लेट नसलेल्या वाहनांचा उपद्रव झाला आहे, या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे.”