जगात दोन प्रकारचे मूर्ख असतात

१.अतिशय मूर्ख

२. ठार मूर्ख

मूर्खांच्या या कॅटेगरीज् ज्या महान लोकांनी तयार केल्या ते ‘पोचलेले येडे’ यापेक्षा वरच्या कॅटेगरीत असतात.

या बातमीमधली दोघंजण याही पलीकडची आहेत.

‘आ बैल मुझे मार’ वगैरे विसरा. जळत्या निखाऱ्यांवर चालून आपलं साहस सिध्द करणाऱ्यांना मनात आणू नका, ‘जल्लीकट्टू’ वगैरे खेळांमध्येही आपलं धैर्य अजमावणाऱ्या लोकांचीही गणती करू नका. या दोघांचं शौर्य पाहून २१ तोफांची सलामी तोफा यांच्याकडे करून दिली पाहिजे.

तर हे दोघे झेब्राचा पोषाख घालून एका जंगलात गेले. आणि तेसुध्दा कुठे? ज्याठिकाणी सिंहांचा वावर असतो तिथे. आता या दोघांची अॅक्टिंग वगैरे काही अव्वल दर्जाची नव्हती पण त्यांनी घातलेल्या झेब्राच्या पोषाखामुळे शिकारीच्या शोधात असणाऱ्या काही (खऱ्या) सिंहिणींनी या दोघांवर हल्ला केला. बघा पुढे काय झालं ते


सौजन्य-फेसबुक

‘दोनच गोष्टी अनंत आहेत, या विश्वाचा पसारा आणि माणसाचा मूर्खपणा. यापैकी फक्त पहिल्याच गोष्टीविषयी माझ्या मनात शंका आहे’ असं अल्बर्ट आईनस्टाईनने म्हटलं होतं. आईनस्टाईन मोठा द्रष्टा होता. जगात यापुढे काय गोष्टी घडणार आहेत याची त्याला कल्पना होती. म्हणून त्याने मांडलेल्या थिअरीज् शंभर वर्ष झाली तरीही काळाच्या कसोटीवर टिकून आहेत.

या व्हिडिओमधल्या दोघांना नक्की काय करायचं होतं म्हणून त्यांनी हा उद्योग केला हे कळायला मार्ग नाही. पण या सिंहिणींनी केलेल्या हल्ल्यानंतर या दोघांची (त्या पोषाखातच) पळताना जी घाईगडबड झाली ते पाहताना हसून पोट दुखतं. या दोघांना आपला जीव जास्त झाला होता, की एका नवीन अॅडव्हेंचर स्पोर्ट्सच्या प्रकाराला ते जन्म देत होते हे सध्यातरी माहीत नाही. पण असं खरंच असतं तर एका नवीन क्रीडाप्रकाराला जन्म देताना प्राणांची (एवढ्या मूर्खपणे) बाजी लावणारे हे पहिलेच ठरले असते.

Story img Loader