कधी कधी मस्तीच्या नादात आपल्या हातून असं काही घडतं की पुढे त्याचे गंभीर परिणाम भोवावे लागतात. नेमका असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. बॉम्ब फोडणे किंवा रॉकेट पेटवणे आवडत नाही असं क्वचितच एखादा तुम्हाला भेटेल. रॉकेट पेटवल्यानंतर तो आकाशात जाऊन फुटत असल्याने सुरक्षित असलं तरी कधी कधी या रॉकेटमुळे अनेक धोकादायक घटना सुद्धा घडत असतात. रॉकेट पेटवल्यानंतर तो उडून दिशा इकडे तिकडे होऊन कोणत्याही ठिकाणी जो फुटू शकतो. म्हणून लोक खुल्या जागेत रॉकेट उडवण्याचा सल्ला देतात. पण काही नग असेही असतात की रहदारीच्या भागात सुद्धा रॉकेट अगदी बिनधास्तपणे पेटवतात. मग यात कुणाचा जीव जरी गेला तरी अशा महानगांना काही फरक पडत नाही. नेमका असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बिल्डींगच्या छतावर एका बाटलीत रॉकेट ठेवलं आहे. एक तरुण हे रॉकेट पेटवण्याचा प्रयत्न करत असतो. रॉकेट पेटवताना हा तरूण स्वतः घाबरलेला दिसून येतोय. रॉकेट पेटवल्यानंतर ते हळुहळु जळू लागते आणि बाटलीतून बाहेर पडून वर उंचावर जातं. पण उंचावर गेल्यानंतर या रॉकेटची दिशा भरकटते आणि तो जवळच्याच एका रिकाम्या इमारतीच्या दिशेने उडू लागतो. यानंतर पुढे जे घडतं ते फार धक्कादायक आहे. या व्हिडीओचा शेवट मात्र भयंकर पद्धतीने होतो. मस्तीच्या नादात खूपच भयंकर घटना घडते. आकाशात वर उंचावर गेल्यानंतर दिशा भरकटलेलं हे रॉकेट बाजुला असलेल्या एका इमारतीत घुसतं आणि एका मजल्यावर या रॉकेटचा मोठा स्फोट होतो.

आणखी वाचा : ‘स्पायडर मॅन’चा मास्क घालून चित्रपट पाहण्यासाठी आला, तिकीट काउंटरवरच्या महिलेने ‘हा’ विचित्र प्रश्न विचारला… पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : आईस्क्रीमवाल्याच्या अंतिम यात्रेचा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल

या भयंकर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ Kunal Qumar नावाच्या युट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडीओची सुरूवात पाहून पुढे काहीतरी मजेदार पहायला मिळणार असंच प्रत्येकाला वाटू लागतं. पण व्हिडीओच्या शेवटी जे घडतं ते पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओतील एक गोष्ट लोकांना अजिबात आवडली नाही. इमारतीत गेल्यावर रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर तरुणाच्या हसण्यावर लोकांनी उग्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या हसण्याला मानवतेविरुद्ध सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर काही लोक केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून याकडे पाहत आहेत.

Story img Loader