Viral Video: अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाने जोर धरला आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला दिसून येतं. दरवर्षी पावसाळ्यात अनेक घटना घडतात; कुठे अपघात होतो, तर काही गावं पावसाने आणि वादळी वाऱ्याने अगदी उद्ध्वस्त होऊन जातात. या सगळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अगदी सोसाट्याचा वादळीवारा असला तरी कामानिमित्त घराबाहेर निघणं अनेकदा अनिवार्य होऊन जातं. अशा वेळेस जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेड अलर्ट असल्यास घराबाहेर पडण्यास बंदीच केली जाते, परंतु तरीही काही माणसं हा धोका पत्करून घराबाहेर पडतात आणि जीव गमावून बसतात.

हेही वाचा… Viral Video: अबब! वरमाला घालताच वराने लगावली वधूच्या कानशिलात, त्यानंतर घडलं ‘असं’ काही की, VIDEO पाहून व्हाल थक्क

पावसात घडणाऱ्या अपघाताच्या घटना काही आपल्यासाठी नवीन नाहीत. अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेलेली गावं तसेच वादळी वाऱ्यामुळे गावं उद्ध्वस्त होऊन जखमी झालेली लोकं अशा बातम्या आपण अनेकदा पाहिल्या आहेत. आता अशाच एका गावात वादळी वारा सुटल्याने एका माणसाचा जीव जाता जाता बचावला, असं म्हणणं अयोग्य ठरणार नाही.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका गावातील रस्त्यावर रहदारी दिसतेय. पावसाचं चिन्ह असून वादळी वारा वाहताना दिसतोय. सोसाट्याचा वारा सुटल्याने अचानक एक छप्पर वाऱ्याच्या वेगाने येऊन एका माणसावर कोसळणार, इतक्यात तो माणूस सावध होतो आणि बाजूला सरकतो. एका सेकंदाच्या सावधगिरीमुळे या गृहस्थाचे प्राण वाचतात, असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा… MS DHONI VIRAL POST: “काला फॉर…”, एम. एस धोनीला रंगावरून केलं ट्रोल; नेटकरी म्हणाला, “या कारणामुळेच मुलींना बिहारी…”

हेही वाचा… Viral Video: “रागावतो माझ्यावर बाप माझा, त्याला माहित्येय की..”, दुसऱ्याला आनंद देताना भरउन्हात उभ्या पितापुत्रांचा व्हिडीओ पाहून पाणावतील डोळे

वाऱ्याच्या वेगाने कोसळलेलं छप्पर एका दुचाकीवर येऊन कोसळतं. आजूबाजूची माणसं सतर्क होऊन वेळीच तिथून पळ काढतात. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “भावाची नजर खूप तीक्ष्ण आहे म्हणून भाऊ वाचला”, तर दुसऱ्याने लिहिलं, “नशीब भाऊ वाचला, नाहीतर आज काय झालं असतं?” हा व्हिडीओ ‘annu22_sa_’ आणि ‘memofile.com69’ या इन्स्टाग्राम अकाउंट्सवरून शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of roof collapsed and almost hit the man due to windstorm dvr