सोशल मीडियावर आपल्यासमोर असे काही व्हिडीओ येत असतात, जे पाहून आपले मनोरंजन होतं, तर काही व्हिडीओ हे आपल्या भावूक करून सोडणारे असतात. सोशल मीडिया हे एक असं जग आहे. जेथून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला देखील मिळतात. पण सोशल मीडियाच्या जगात वावरताना माणूसकीचा विसर पडलाय की काय, अशी भीती सध्याचं वातावरण पाहून मनात येत असते. पण ही भीती घालवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, माणूसकी अजून जिवंत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दिव्यांग मुलाच्या मदतीसाठी आरपीएफचे जवान पुढे आला आहे. एक दिव्यांग मुलगा ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. परंतू ट्रेनच्या दरवाज्याजवळ असलेल्या पायऱ्या त्याला चढता येत नव्हत्या. तो व्हिलचेअरवरच बसून राहतो. हे पाहून तिथले आरपीएफ अधिकारी त्याच्या मदतीला येतात. या दिव्यांग मुलाला त्याच्या व्हिलचेअरवरून उचलून त्याला व्यवस्थित ट्रेनमध्ये चढवतात. आपल्या खांद्याचा आधार देत या मुलाला ते फक्त ट्रेनमध्ये चढवत नाहीत तर त्याच्या सीटपर्यंत नेऊन त्याला बसवतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडत होता अन् लोक स्माईल देत सेल्फी काढत होते…

हा व्हिडीओ तामिळनाडूतील विरुधाचलम रेल्वे स्थानकावरचा असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिव्यांगाची मदत करणाऱ्या अधिकारी हे उपनिरीक्षक सरवणन अशी ओळख करण्यात येतेय. या दिव्यांग मुलासोबत एक महिला देखील दिसून येतेय.

आणखी वाचा : उगाच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणत नाहीत…हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिण्यात आलीय. “आरपीएफचे उपनिरिक्षक सरवणन यांचं कौतुकास्पद कृत्य…एका दिव्यांग प्रवाशाला उचले आणि विरुधाचलम स्टेशनवर ट्रेनमध्ये चढण्यास मदत केली. आम्हाला उपनिरीक्षक सरवणन सारख्या आणखी लोकांची गरज आहे.” हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत.

आणखी वाचा : नशेत धुंद महिलेचा VIDEO VIRAL, उभंही राहता येत नव्हतं….

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका व्यक्तीने असा नागिन डान्स केला की नाग बनून दुसऱ्या माणसाच्या अंगावर उडीच घेतली…

या व्हिडीओने लाखो हृदयांना स्पर्श केला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मात्र, कमेंट सेक्शनला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेकांनी मदतीचा हात दिल्याबद्दल आणि खर्‍या लोकसेवकाच्या कर्तव्याचे प्रदर्शन केल्याबद्दल आरपीएफचे कौतुक केले, तर अनेकांनी चांगल्या सुविधा नसल्याबद्दल आणि दिव्यांग लोकांचा विसर पडल्याबाबत सरकारला दोष दिला. या व्हिडीओला आतापर्यंत ३६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader