प्राणी अनेकवेळा माणसांच्या वस्तीत गेल्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल. मात्र तुम्ही कधी कोणत्या प्राण्याला चहाच्या टपरीवर दररोज न चुकता गेल्याचं पाहिलंय का? होय.. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक सांबर चहाच्या टपरीवर पोहोचले आणि तिथे असलेल्या माणसांनी त्याला नाश्ता भरवायला सुरूवात केली. हे सांबर या स्टॉलवर दररोज येतं आणि मनसोक्त खाऊन जातं.
भारतीय वनसेवा (IFS) अधिकारी डॉ सम्राट गौडा यांनी ही क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये एक सांबर हरण चहाच्या स्टॉलसमोर उभं राहून तिथल्या खाद्यपदार्थांकडे पाहत आहे. तितक्यात एक माणूस सांबरला त्याच्याकडे येण्यासाठी हातवारे करतो. सांबर त्याच्याजवळ जाताच तो माणूस त्याला खायला देतो. हे सांबर त्याने भरवलेलं खात राहते. तिथे जमलेले बाकी लोक देखील त्याला जवळून पाहण्यासाठी येतात.
( हे ही वाचा: Video: दोन महिलांचा कार पार्क करतानाचा व्हिडिओ Viral; शेवटी असं काही घडलं की लोकांनाही हसू आवरेना)
IFS अधिकाऱ्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे
( हे ही वाचा: Video: पिल्लांसाठी कोंबडीने घेतला रुद्रावतार! कोब्रावर झडप घालत…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण)
एक माणूस त्याच्या मित्राला सांबर सोबतचा फोटो काढायला सांगताना दिसत आहे. तो त्याच्या शिंगांनाही स्पर्श करतो. दुसरा त्याला चहा देतो, पण सांबर हरण त्याला नकार देते. आयएएफ अधिकारी डॉ सम्राट गौडा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘जर हरण स्थानिक चहाच्या दुकानात गेले तर ते काय देतील? खरे सांगायचे तर, वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीत येणे हे चांगले लक्षण नाही. त्याने हा व्हिडीओ शूट केलेल्या ठिकाणाचा उल्लेख केलेला नसून, तो भारतातील असल्याचे मानले जात आहे.