Satyanarayn Puja: पवित्र श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेला हिंदू धर्मीयांमध्ये विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावणात अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते. अशाच एका पूजेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सत्यनारायणाची पूजा, आता त्यात वेगळं काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल पण या व्हिडीओ मध्ये गुरुजी चक्क इंग्रजी मध्ये श्लोक म्हणताना पाहायला मिळत आहेत. हे मॉडर्न भटजी आणि त्यांचे इंग्रजी ऐकून अनेकजण खुश झाले आहेत तरी काहींनी यावर टीका सुद्धा केल्याचे दिसतेय.
या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की पूजासाहित्य आणि ते मांडण्याची पद्धत दाक्षिणात्य संस्कृतीनुसार दिसत आहे. अनेक दाक्षिणात्य राज्यांमध्ये मायबोली नंतर केवळ इंग्रजीमधूनच संवाद साधला जातो त्यामुळे कदाचित हा व्हिडीओ मूळ दक्षिण भारतीय कुटुंबातील असावा असा अंदाज आहे. रुमानी नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर करत, ” आता भटजी पण अपग्रेड झाले आहेत, ऐका इंग्रजी मधील सत्यनारायण कथा” असे कॅप्शन दिले आहे. आतापर्यंत ८ हजाराहून अधिक ट्विटर वापरकर्त्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
इंग्रजी सत्यनारायण कथा
अनेकदा पूजा विधींमध्ये भटजी काय बोलतात हे आपल्याला समजत नाही साहजिकच पूजेचा मूळ हेतू यामुळे अपुरा राहतो. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ मध्ये मात्र हे भटजी त्या पूजेला बसलेल्या दांपत्याला नीट समजावून सत्यनारायणाची कथा सांगत आहेत. इंग्रजी मध्ये सांगतानाही कथेचा मूळ अर्थ कुठेही बदललेला दिसत नाही त्यामुळेच अनेकांनी या कौतुक केले आहे.
Video: भेळपुरी विकताना मोबाईल सुरु केला अन.. सेकंदात व्हिडिओ Viral झाला, तुम्हीच पहा
तर दुसरीकडे आपल्या संस्कृतीचे इंग्रजीकरण झाल्याचे म्हणत अनेकांनी व्हिडीओवर टीका सुद्धा केली आहे मात्र भाषेपेक्षा पुझेतील अर्थ समजून घेणे गरजेचे असं म्हणत नेटकऱ्यांनीच या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.