School Student Viral Video: शाळा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर खूप आठवणी येतात. मागच्या बेंचवर बसून केलेली मजा, पी.टी.चा तास, वर्गातली मस्ती, चोरून डबा खाण, किंवा असं काहीतरी करणं जे कायम लक्षात राहिल. शाळेतील अशा काही खास गोष्टी आजही अनेकांच्या लक्षात राहतात. आधी शाळेतले दिवस आठवून लोक समाधान मानायचे. पण सध्या सोशल मीडियामुळे आजकाल शाळा-कॉलेजमध्ये काही मजेशीर घडलं की त्याचे व्हिडीओ सर्रास व्हायरल होतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये अनेकदा शाळा-कॉलेजमधील मुलांच्या डान्सचे व्हिडीओ किंवा काही मजेशीर व्हिडीओ असतात. पण यातले काही व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एक शालेय विद्यार्थी असं काही करतो जे पाहून सगळेच थक्क होतात. विद्यार्थ्याची अशी हुशारी पाहून अनेकांनी त्याचं कौतुकदेखील केलं आहे.

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Shocking video of Dog saved girls life from kidnaper viral video on social media
कोण कोणत्या रुपात येईल ते सांगता येत नाही! तो अपहरण करायला आला पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की…, पाहा थरारक VIDEO
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे

हेही वाचा… “मम्मी मेरा फोन…”, विंडो सीटवर बसलेल्या लहान मुलीचा फोन चोराने केला लंपास, VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका शाळेत लेक्चर सुरू असताना एक वेगळाच प्रकार घडतो. सगळे विद्यार्थी वर्गात शिकवणी सुरू आहे म्हणून बसले आहेत. तितक्यात अचानक एका खिडकीतून एक पक्षी येतो. पक्षी येताच सगळी मुलं घाबरतात. पण अचानक जे होत ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो.

वर्गातलाच एक विद्यार्थी अगदी हिंमतीने पुढे जातो आणि त्या पक्ष्याला एका सेकंदाच्या आत हातात पकडून खिडकीबाहेर सोडतो. एका सेकंदात हे नक्की काय घडलं याचा कोणालाच विश्वास बसत नाही, पण सगळेच विशेषत: वर्गातल्या मुली त्या मुलाकडे अगदी आश्चर्याने पाहत असतात.

हा व्हिडीओ @marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून पोरी फिदा झाल्या की भावावर असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल ९ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… काका काय करताय? चालती ट्रेन पकडण्याच्या नादात काकांबरोबर घडलं असं काही की…, VIDEO पाहून तुम्हीही माराल कपाळावर हात

युजर्सच्या कमेंट्स

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्या मुलाच्या घरचाच पक्षी असेल” तर दुसऱ्याने “जब्याचा फॅन दिसतोय” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “योग्य निर्णय घेतला त्या लहान मुलाने, धाडसी आहे पोरगा.” “आता फक्त भावाचीच हवा” अशीदेखील कमेंट एकाने केली.

Story img Loader